शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकाअभावी विद्यार्थ्यांचे हाल

By admin | Updated: July 10, 2016 00:18 IST

अड्याळ येथे बसस्थानकाची समस्या सुटलेली नाही. पावसाचे दिवस सुरू आहे. शुक्रवारच्या दिवशी सतत पाऊस सुरू असल्याकारणाने ...

सामाजिक संघटनांनी टेकले हात : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, बसस्थानक बांधणार कायविशाल रणदिवे अड्याळअड्याळ येथे बसस्थानकाची समस्या सुटलेली नाही. पावसाचे दिवस सुरू आहे. शुक्रवारच्या दिवशी सतत पाऊस सुरू असल्याकारणाने काही शाळांना सुटी देण्यात आली. शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थीनी सध्याच्या समस्याग्रस्त बसस्थानकावर आले, मात्र पावसात थांबायचे कुठे, असा प्रश्न येथील विद्यार्थ्यांना पडला. पाऊस सुरू होताच मुले या नाही त्या टपरीत गेले दुकानात गेले. बसस्थानकाअभावी या विद्यार्थ्यांचे हाल होत आहे.ही व्यथा आहे अड्याळ बसस्थानकातील. एकंदरीत चार ज्युनीअर शाळांनी मोफत बससेवा सुरू केली असली तरी आजही महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसने बरेच विद्यार्थी प्रवास करताना दिसतात. परंतु अड्याळ हे पाच हजार लोकवस्तीचे गाव असून पावसात बसायला सोडा. उभे राहायला प्रवाशांना वा प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासी निवारा उपलब्ध नाही. यापेक्षा अड्याळवासियांचे दुर्देव कोणते.बसस्थानकाजवळचे मुतारीघर आहे. या मुतारीघराची स्वच्छता क्वचितच केली जाते. ग्रामपंचायतीने व्यवस्था केली असली तरी वाईट दशा आता पावसाळा सुरू झाल्याने झाली आहे. दुर्गंधी तर नाहीच परंतु कचरा मात्र दिसतो. पंधरा दिवसातून याला साफ केल्या जात असल्याची माहिती आहे.महत्वाचे म्हणजे इथे येणारा प्रवासी व जाणारा प्रवासी दोघांनाही दोन गोष्टीचा त्रास होत आहे. एक प्रवासी निवासाची व दुसरी शौचालय मुतारीघर. ज्या विद्यार्थ्याजवळ छत्री तो आपली व्यवस्था करतो. परंतु य्या विद्यार्थ्यांकडे छत्री किंवा रेनकोट नाही अशा विद्यार्थ्यांची पावसामुळे प्रचंड गैरसोय होते. येथील बसस्थानक एक गंभीर समस्या बनत आहे. ही समस्या सोडवायला इथून जाणारे आमदार क्षेत्राचे लोकप्रतिनिधी, गाव क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, गाव परिसरातील सामाजिक संघटना कुणीतरी येवून हा सर्वांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी होताना दिसत आहे.येथील ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य वा जिल्ह्याचे आमदार, खासदार असो यांनी जर मनावर आणले तर काय नाही होऊ शकते. ही समस्या एका दिवसात निकाली निघू शकते, असे मत विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीकडे व्यक्त केले. समस्या एकाची नसून प्रत्येक प्रवाशांची आहे. त्यासाठी ही समस्या तातडीने सुटावी हीच मागणी येथे भिजणाऱ्या व सोयी उपलब्ध नसणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केले आहे.