शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांचा जीवन जगण्याचा संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:38 IST

भंडारा जिल्हा हा झाडीपट्टीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. यात अनेक प्राचीन कला व उत्सव साजरे केले जातात. या सोबतच ...

भंडारा जिल्हा हा झाडीपट्टीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. यात अनेक प्राचीन कला व उत्सव साजरे केले जातात. या सोबतच परंपरागत बोली भाषा जपून त्यातून मनोरंजनाचे व जन प्रबोधनाचे कार्यही कलावंतांच्या माध्यमातून होत आले आहे. दिवाळी सणाच्या दुसऱ्या दिवसापासून जिल्ह्यात मंडई उत्सवाचे आयोजन केले जाते. या मंडई उत्सवाच्या माध्यमातून तमाशा, गोंधळ, नाटक, पोवाडा, कीर्तन व अन्य उपक्रमांचे आयोजन केले जाते. या उपक्रमांच्या माध्यमातून कलावंतांना काम मिळत असते. त्यातूनच ते वर्षभर थोडीफार मदत होईल अशी जमापुंजी गोळा करीत असतात. मात्र गत वर्षापासून कोरोना महामारीने त्यांच्यावरही गंडांतर आणले आहे. मंडई उत्सव व सण साजरे झाले नसल्याने त्यांनाही काम मिळाले नाही. हाताला काम न मिळाल्याने त्यांच्यावर मोठे संकट आले आहे. अशातच सप्टेंबर २०२० पासून शासनाने देऊ केलेले २,२५० रुपयांचे मानधनही गत आठ महिन्यांपासून अदा केले नाहीत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. प्राचीन कलेचा वारसा जोपासणाऱ्यांच्या आयुष्यात अंधार पसरला आहे. शासन व प्रशासनाने त्यांच्या या मागणीकडे लक्ष द्यावे अशी मागणी वृद्ध कलावंतांनी केली आहे. मानधन देण्याची मागणी वृद्ध कलावंत साबितराव गजभिये, भीमराव निंबार्ते, अशोक मानकर, लक्ष्‍मण बावणे, आसाराम बावणे, बाळकृष्ण शेंडे, श्यामराव लिचडे, धोंडू केवट, लक्ष्मण मानकर, श्रीपत बोपचे, सुदाम बागडे आदींनी केली आहे

कोट

साहेब जगायचे कसे

गत आठ महिन्यांपासून आम्हाला मानधन मिळाले नाही. त्यातही मंडई उत्सव रद्द झाल्याने उदरनिर्वाहाचा खर्चही यावेळेस मिळाला नाही. आयोजन नसल्याने हाताला काम मिळाले नाही. जगण्याचे एकमेव आधार व शासन देत असलेले मानधन आठ महिन्यांपासून मिळाले नाही. आम्ही जगायचे तरी कसे, असा प्रश्न आमच्यासमोर उपस्थित झाला आहे.

-भीमराव निंबार्ते, वृद्ध कलावंत

मालीपार, ता. भंडारा