शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

दमदार पाऊस तरीही प्रकल्प तहानलेलेच

By admin | Updated: July 19, 2016 00:34 IST

जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कोसळत असला तरी मध्यम प्रकल्प अद्यापही तहानलेलेच दिसत आहे.

४२९ मिमी नोंद : मध्यम, लघु व जुन्या मालगुजारी प्रकल्पांमध्ये निम्माच जलसाठाभंडारा : जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कोसळत असला तरी मध्यम प्रकल्प अद्यापही तहानलेलेच दिसत आहे. वार्षिक सरासरीच्या निम्मा पाऊस पडूनही मध्यम, लघु व जुने मालगुजारी प्रकल्पात अपेक्षित जलसाठाच झाला नाही. बहुतांश प्रकल्पात क्षमतेच्या अर्धा अधिक जलसाठा झाला असून या प्रकल्पांना आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ १५ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी याप्रकल्पाचा उपयोग होता. अलिकडच्या काही वर्षात अपऱ्या पावसाने या प्रकल्पात पुरेसा जलसाठा झालाच नाही. यंदा वरूण राजाच्या कृपेने जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्प तुडुंब भरतील, अशी आशा आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वार्षिक सरासरीच्या निम्मा पाऊस झाला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी असून आतापर्यत जिल्ह्यात ४२९ मिमी पाऊस कोसळला आहे. मात्र प्रकल्पांमध्ये अद्यापही पुरेसा जलसाठा झाला नाही. जिल्ह्यात एकूण चार मध्यम, ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ११़७५ टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ६.६५ टक्के आहे़ सध्यस्थितीत बेटेकर बोथली प्रकल्प वगळता चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी ५, बघेडा १६, सोरना जलाशयात उपयुक्त जलसाठा ९ टक्के आहे़लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरमडा १२ टक्के, कवलेवाडा ६ टक्के, पवनारखारी निरंक, आंबागड ५, परसवाडा १२, डोंगरला २२, कारली १५. भंडारा तालुक्यातील चिखलपहेला ४, रावणवाडी १२, सिल्ली आंबाडी १५. पवनी तालुक्यातील वाही १४, भिवखिडकी २६, कार्तुली ९, पिलांद्री २४, साकोली तालुक्यातील शिवणीबांध १५, कुंभली १६, गुढरी ५२, लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी १७ तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा ३९, वाकल ५४ व खुर्शिपार जलाशयात १० टक्के जलसाठा आहे.मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे. सध्याही ढगाळी वातावरण आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा जलसाठा निश्चितच वाढणार आहे. हे प्रकल्प तुडुंब झाल्यास रबी हंगामात सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. (नगर प्रतिनिधी)