शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनातून विचार प्रबोधनाला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 06:00 IST

परिवर्तन विचार मंच द्वारा शासन रश्मी परिसर गांधी भवन पवनी येथे आयोजित पहिल्या मुक्त प्रतिनिधी परिवर्तन साहित्य संमेलनातून ना. रा. शेंडे सभागृहात स्मृतीशेष डॉ. वा. ना. मेश्राम प्रज्ञा मंचावरुन उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. विनोद मेश्राम होते.

ठळक मुद्देसुषमा भड : पवनी येथे परिवर्तन साहित्य संमेलनाचे उद्घाटन, अनेक साहित्यिकांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : फुले, शाहू, आंबेडकर या थोरपुरुषांच्या प्रेरणादायी विचारांमुळे ओबीसी महिला जागृत झाल्या आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनआंदोलनाला वेगळा आयाम दिला. त्यांनी मानवतावादास प्राधान्य देऊन अनेकांना हादरे दिले. या परिवर्तन साहित्यामधून माणसे घडून विचार प्रबोधनाला बळ मिळेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय ओबीसी महिला संघाच्या अध्यक्षा सुषमा भड यांनी केले.परिवर्तन विचार मंच द्वारा शासन रश्मी परिसर गांधी भवन पवनी येथे आयोजित पहिल्या मुक्त प्रतिनिधी परिवर्तन साहित्य संमेलनातून ना. रा. शेंडे सभागृहात स्मृतीशेष डॉ. वा. ना. मेश्राम प्रज्ञा मंचावरुन उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या.संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. विनोद मेश्राम होते. यावेळी स्वागताध्यक्ष नगराध्यक्ष पुनम काटेखायेच तर प्रमुख अतिथी म्हणून परिवर्तन विचार मंचचे अध्यक्ष विलास गजभिये, कार्याध्यक्ष शालीक जिल्हेकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे पर्यटन विभाग प्रमुख डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे, अखिल भारतीय भिक्कू संघाचे संघानुशासक भदंत सदानंद, भंदत ज्ञानबोधी थेरो, प्रा. भीमराव गायकवाड, पत्रकार मिलींद फुलझेले, मनोहर मेश्राम, पुनम हटवार आदी उपस्थित होते.साहित्यिकांचे ऐतिहासिक पवनी शहरात आगमन होताच वाजत गाजत गांधी चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रॅली काढण्यात आली. रॅली संमेलनस्थळी पोहचल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करुन संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अनेक साहित्यीकांच्या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करुन सपत्नीक शाल, स्मृतीचिन्ह, साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी विलास गजभिये, पुनम काटेखाये, यांनी मार्गदर्शन केले. डॉ.प्रियदर्शी खोब्रागडे यांनी पवनीतील प्राचीन बौद्धस्तुपावर मार्गदर्शन केले.संमेलनाचे अध्यक्ष प्रा.विनोद मेश्राम यांनी साहित्य संमेलन हा आरसा असून पवनीतील परिवर्तन साहित्य संमेलन हे समाजाला नवीन दिशा देणार असल्याचे सांगितले.प्रास्ताविक मनोहर मेश्राम यांनी केले. संचालन कवी संजय गोडघाटे व आभार प्रदर्शन लक्ष्मीकांत तागडे यांनी केले. स्वागत गीत आठल्ये यांच्या मार्गदर्शनात वैनगंगा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थींनीनी गायले. संमेलनात विदर्भातून मोठ्या संख्येने साहित्यीक सहभागी झाले होते.

टॅग्स :literatureसाहित्य