शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

महसूल विभागाच्या चौकीमुळे अपघाताला बळ

By admin | Updated: January 23, 2017 00:18 IST

पवनी निलज मार्गावरील बसस्थानकाशेजारील महसुल विभागाचे चौकीने प्रवासी, विद्यार्थी यांची डोकेदुखी वाढविली आहे.

पवनीतील प्रकार : चौकी हटविण्याची मागणीभंडारा : पवनी निलज मार्गावरील बसस्थानकाशेजारील महसुल विभागाचे चौकीने प्रवासी, विद्यार्थी यांची डोकेदुखी वाढविली आहे. चौकीवर रेती रॉयल्टी तपासणी होत असल्याने नेहमीच टिपरच्या रांगा पाहायला मिळतात. त्यामुळे रस्त्याच्या आवगमन करणाऱ्यांना प्रवाशांना अपघाताची शक्यता बळवली आहे. मोठा अपघात होण्याची वाट पाहण्या अगोदरच ती चौकी दुसरीकडे हटविण्याची मागणी होत आहे.पवनी तालुक्यात चार रेती घाटाचे लिलाव झाले असून निलज-पवनी मार्गावर पवनी बसस्थानकाजवळ महसुल विभागाची रॉयल्टी तपासणी चौकी आहे. पूर्वी ही चौकी निलज फाट्यावर होती. ही चौकी बसस्थानकाच्या समोर असुन पवनी शहरात शाळा, कॉलेज शासकीय व निमशासकीय कार्यालये असुन या रस्त्याने तहसिल कार्यालय, बसस्थानक व शहरात जाणाऱ्यांची नेहमीच वर्दळ असते. बसस्थानकासमोर महसुल विभागाने दोन मोठे ब्रेकर तयार केल्याने या ब्रेकरमुळे अनेकांचे कंबरडे मोडले आहेत. सदर चौकीत रेती रॉयल्टी तपासणी होत असल्याने येथे लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. वाहतुकीला अडथळा निर्माण होत असुन दररोजचे लहान मोठे अपघात पाहायला मिळतात. चौकीला लागूनच देशी दारु व बारचे दुकान असल्याने येथे मद्यपीचे नेहमीच वर्दळ असते. जुन्या बस्थानकावर प्रवाशांची गर्दी असल्याने प्रवाशी जुन्या बसस्थानकावर न थांबता बसमध्ये बसण्याची जागा मिळावी म्हणून नविन बसस्थानकावर जातात. त्यामुळे या मार्गावर तहसिल कार्यालय व नविन बसस्थानक असल्याने रस्त्याने नेहमीच वर्दळ असते. बसस्थानकाशेजारीच चौकी असल्याने कित्येकदा अपघात झाल्याचे उदाहरण आहेत. सदर चौकीत पोलीस विभागाचे दोन पोलीस तैनात असतात. मात्र त्यांना हे अपघात दिसत नाही काय?यापूर्वी ही चौकी पेटविण्यात आली होती. चौकीच्या समोरच बार आहे. चौकीतील कर्मचारी बार मध्ये नेहमीच आढळतात. कर्मचारी दारुपीऊन डीवटी करत असल्यामुळे अनेक चालकासोबत विनाकरण अरेरावी करीत असतात. याकडे वरिष्ठ अधिकारी मात्र दुर्लक्ष करीत आहेत. ही चौकी हटविण्याकरिता अनेक पालकांनी वरिष्ठांनी तक्रारी करुनही वरिष्ठ अधिकारी कानाडोळा करीत आहेत. एखाद्याच्या जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार काय? ही महसुल विभागाची चौकी जीवघेणी ठरत असून एखाद्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. ती चौकी तात्काळ हटविण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)या चौकीमुळे या परिसरात एस.टी. बसला व प्रवाशांना अडथळा निर्माण होतो. चौकी हटविण्या संदर्भात येथील तहसिलदार यांना चौकी हटविण्याबाबद लेखी तोंडी तक्रार देवूनही कोणतीच कारवाही होत नसल्यामुळे ही चौकी दिवसेंदिवस त्रासदायक ठरत असून अपघाताला आमंत्रण देत आहे.- गौतम शेंडेआगार व्यवस्थापक पवनी