शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेचे पंपगृह बंद

By admin | Updated: August 5, 2015 00:47 IST

खरीप हंगामात नदी पात्रातून पाण्याचा उपसा करण्यासाठी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे पंपगृह सुरू करण्यात आले. मात्र, पाण्याअभावी ३६ तासातच हे पंपगृह बंद करण्यात आले आहे.

बावनथडी नदीचे पात्र आटले : राजीवसागर प्रकल्पाचे पाणी सोडा चुल्हाड (सिहोरा) : खरीप हंगामात नदी पात्रातून पाण्याचा उपसा करण्यासाठी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे पंपगृह सुरू करण्यात आले. मात्र, पाण्याअभावी ३६ तासातच हे पंपगृह बंद करण्यात आले आहे. बावनथडी नदीचे पात्र कोरडे पडल्याने राजीव सागर प्रकल्पाचे पाणी नदी पात्रात सोडण्याची ओरड सुरू झाली आहे.सिहोरा परिसरात १४ हजार हेक्टर आर शेतशिवारात हरितक्रांती घडवून आणण्याची क्षमता सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प आणि विस्तीर्ण चांदपुर जलाशयात आहे, असे महत्वपूर्ण प्रकल्प आणि जलाशय असताना नियोजन शुन्यतेमुळे यंदा पाण्याअभावी भिषण दुष्काळाचे चित्र परिसरात निर्माण झाले आहे. निर्धारित कालावधीचे धानाची नर्सरी शेतकऱ्यांनी निर्माण केली आहे. मध्यंतरी पावसाने हजेरी लावल्याने आशान्वीत शेतकऱ्यांनी या नर्सरीत खत आणि औषधाची फवारणी केली आहे. परंतु पाऊस बेपत्ता झाल्याने धानाची नर्सरी नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे. शेतकऱ्यावंर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. स्वतंत्रदिनापर्यंत पाण्याअभावी मोठे संकट निर्माण होणार आहे. दरम्यान नाल्यांचे पाणी नदीपात्रात आल्याने सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे तीन पंपगृह सुरू करण्यात आले आहे. परंतु नदी पात्रातील पाणीच आटल्याने हे पंप ३६ तासात बंद करण्यात आले आहे. जलाशयात पाण्याची साठवणूक नगण्य आहे. यामुळे शेतकरी राजीव सागर धरणाचे पाणी नदी पात्रात सोडण्याची ओरड करीत आहे. या प्रकल्पाला आमदार चरण वाघमारे यांनी भेट देवून स्थितीचा आढावा घेतला आहे. संपूर्ण पंपगृह यंदा पाण्याचा उपसा करण्यासाठी तयार असताना निसर्गाने पाठ फिरविल्याने भयावह सकंटावर चिंता व्यक्त केली आहे. यावेळी पंचायत समिती सभापती कविता बनकर, पंचायत समिती सदस्य विमल कानतोडे, मयुरध्वज गौतम, बाला तुरकर, गजानन निनावे आदी उपस्थित होते.शेतकरी बंडू बनकर, अंबादास कानतोडे, देवानंद लांजे यांनी आ. वाघमारे यांना शेतकऱ्यांना तारण्यासाठी राजीव सागर धरणाचे पाणी नदी पात्रात सोडण्याची चर्चे दरम्यान विनवणी केली. ३५ हजार शेतकरी व त्यांचे कुटूंब, जनावरांचा चारा आदी समस्या निर्माण होणार असल्याची माहिती माजी सभापती कलाम शेख यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांचे नजरा राजीव सागर धरणातून सोडणाऱ्या पाण्याकडे लागलेल्या आहेत. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात एकाच पक्षाचे सरकार आहे. यामुळे शेतकऱ्यांना तारण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. (वार्ताहर)राकाँची पत्रपरिषदेत मागणीचांदपुर जलाशयात पाण्याचा उपसा करण्यासाठी प्रकल्पाला पाण्याची गरज आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिके नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने राजीव सागर धरणाचे पाणी नदीत सोडण्याची मागणी बपेराचे जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा तुरकर, सिहोराचे धनेंद्र तुरकर, चुल्हाडचे प्रतिक्षा कटरे, पंचायत समिती सदस्य सुप्रिया रहांगडाले, अरविंद राऊत, राजेंद्र ढबाले यांनी केली आहे.नदीपात्रात राजीव सागर धरणाचे पाणी सोडून प्रकल्प पाण्याचा उपसा करणार आहे. येत्या स्वतंत्र दिनापर्यंत अंतिम निर्णय पूर्ण झाला पाहिजे. याकरिता चुल्हाड बस स्थानकावर १५ आॅगस्टला रास्ता रोको आंदोलन करणार आहे.- रमेश पारधी, माजी उपाध्यक्ष जि.प. भंडारा