शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

कर्कापुरात पुन्हा आगीच्या घटनेसह दगडांचा मारा

By admin | Updated: April 18, 2017 00:38 IST

तुमसर तालुक्यातील कर्कापुरात मागील चार दिवसांपासून घर, गोठ्यांना रहस्यमयरीत्या आग लागत असल्याच्या घटना घडत आहेत.

सायंकाळपासून अघोषित संचारबंदी : ग्रामस्थांचा जीव धोक्याततुमसर : तुमसर तालुक्यातील कर्कापुरात मागील चार दिवसांपासून घर, गोठ्यांना रहस्यमयरीत्या आग लागत असल्याच्या घटना घडत आहेत. आता दोन दिवसांपासून दगडांचा वर्षाव होत आहे. शेंदूर फासलेल्या दगडांच्या वर्षावामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी मयुर आगाशे यांच्या घराला आग लागली. १३ एप्रिल रोजी महादेव पडोळे, प्रदीप आगाशे, महेश बुध्दे, मुकुंदा आगाशे यांच्या घर व तणसाच्या ढिगाला आग लागल्याच्या घटना घडल्या. पुन्हा १४ एप्रिलला महादेव पडोळे व माधोराव आगाशे यांच्या घरी आग लागली. १७ एप्रिलला मयुर आगाशे यांच्या घराला आग लागली. यात घर जळुन खाक झाले. १७ च्या मध्यरात्री २ ते ३ च्या सुमारास मोठे दगडांचा मारा करण्यात आला. या दगडांना रंगवजा शेंदूर, काळसर डाग पडलेले आहेत. दगडांच्या माऱ्यांमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दोन दिवसापूर्वी आमदार चरण वाघमारे यांनी कर्कापूर गावाला भेट दिली होती. ग्रामस्थांशी चर्चा केली. तालुका व जिल्हा प्रशानाला याबाबत त्यांनी माहिती दिली. ग्रामस्थांना आमदार वाघमारे यांनी धीर दिला. नायब तहसीलदार एन. पी. गौंड यांनी गावाला भेट देवून पाहणी केली. त्यानंतर पुन्हा घरांना आग लागणे व दगडांचा वर्षाव सुरु झाला. जादूटोणा व भानामतीचा हा प्रकार सुरु असल्याची गावात चर्चा सुरु आहे. जिल्हा प्रशासनाने येथे तज्ज्ञांचे पथक तथा अंधश्रद्धा निर्मुलन समितीला पाचारण करण्याची गरज आहे. दररोज यापुढे कुणाच्या घराला आग लागेल व दगडांच्या माऱ्यात आपला जीव तर जाणार नाही या भीतीने सायंकाळी ७ वाजतानंतर गावात अघोषित संचारबंदी लागू होते.गावातील युवक येथे रात्री पहारा देत आहेत. पंरतु प्रशासनाने या गंभीर घटनेची दखल घेण्याची खरी गरज आहे. आठ ते दहा वर्षापूर्वी येथे आग व दगडांचा मारा झाल्याची घटना झाली होती, असे ग्रामस्थ सांगतात. कर्कापुरात फॉस्फरसचे प्रमाण अधिक असल्याने आगीच्या घटना घडतात असे सांगण्यात येते. पंरतु तणसाच्या ढिगाला वरुन आग कशी लागत आहे. असा प्रतिप्रश्न येथील ग्रामस्थ करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)