शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा मिलमध्येच मुक्काम

By admin | Updated: January 24, 2015 00:23 IST

शेतकऱ्यांच्या हितासाठी दि सहकारी राईस मिल सोसायटी निर्माण करण्यात आली आहे. परंतु सध्या या मिलची वाताहर झाली आहे.

चुल्हाड (सिहोरा) : शेतकऱ्यांच्या हितासाठी दि सहकारी राईस मिल सोसायटी निर्माण करण्यात आली आहे. परंतु सध्या या मिलची वाताहर झाली आहे. धान घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना विश्रांती घेण्यासाठी कक्ष नसल्यामुळे मिलमध्येच मुक्काम करावा लागतो. त्याचप्रमाणे शौचालयाची सुविधा नसल्यामुळे उघड्यावरच सर्व विधी आटपावा लाग आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे धान भरडाई (पिसाई) करण्यासाठी सहकार क्षेत्रातून राईस मिलची निर्मिती करण्यात आली आहे. धान भरडाई (पिसाई) करिता येणाऱ्या शेतकऱ्यासाठी विश्रांती घेणारे कक्ष तयार करण्यात आले नाही. रात्रभर शेतकरी मिल मध्येच मुक्काम ठोकतात. या मिलमध्ये साधे शौचालय तयार करण्यात आले नाही. उपक्रमांना सहकार क्षेत्रात उदासिनता दिसून येत आहे. चुल्हाड गावात सन १९६४ मध्ये दि सहकारी राईस मिल सोसायटी स्थापन करण्यात आली आहे. १८ गावचे सभासद या मिलच्या कार्यकारिणी मंडळात आहेत. ५० वर्षी पुर्वी बांधकाम करण्यात आलेली इमारत आजघडीला जिर्ण झाली आहे. पंरतु वाढत्या स्पर्धेत ही मिल डबघाईस निघाली आहे. इमारतीला जागो-जागी भेगा पडल्या आहेत. उत्पन्नात कमालीची घट झाल्याने विकासाला ब्रेक लागला आहे. यामुळे सहकारी राईस मिल शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यांची लहान मुले टेबलावर विश्रांती घेत आहेत. जमाव, गर्दी तथा २४ तास कार्य करणाऱ्या मिलमध्ये मंजुरी देतांना शौचालय बांधकामाची अट नाही. पिण्याचे शुध्द पाणी नाही. विश्रांती कक्षाचे नियोजन नाही. यामुळे शेतकऱ्याची वाताहात होत आहे. बहुतांश खाजगी मिलमध्ये हया सुविधा बोटावर मोजण्या इतपत आहेत. परिणामी शौचालय नसल्याने शेतकरी राईस मिल आवारात उघड्यावर शौचास जात आहे. विकासाकरिता सहकारी राईस मिल संचालक मंडळ तथा खाजगी राईस मिल मालकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. (वार्ताहर)