शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

कारखाना सुरू करा, अन्यथा अनुदान परत करा

By admin | Updated: April 13, 2017 00:27 IST

तुमसर तालुक्यातील माडगी येथील युनिव्हर्सल फेरो कारखाना मागील अनेक वर्षांपासून बंद आहे.

ऊर्जामंत्र्यांचे आदेश : प्रकरण युनिव्हर्सल फेरो कारखान्याचेभंडारा : तुमसर तालुक्यातील माडगी येथील युनिव्हर्सल फेरो कारखाना मागील अनेक वर्षांपासून बंद आहे. हा कारखाना सुरू करण्यासाठी अभय योजनेतून १२८ कोटी रूपये देऊन मार्चपर्यंत कारखाना सुरू करण्याची अट टाकली होती. परंतु कारखाना सुरू करण्यासाठी कंपनी मालकाने अडचणी सांगितल्या. त्यानंतर आमदार चरण वाघमारे यांनी पुढाकार घेऊन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे बैठक बोलाविली. या बैठकीत कारखाना सुरू करण्याबाबत तोडगा न निघाल्यामुळे कारखाना सुरू करा अन्यथा अनुदान परत करा, असा आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कारखाना व्यवस्थापनाला दिला.सन २०१६ मध्ये हा कारखाना बंद करण्याची परवानगी व्यवस्थापनाने मागितली होती. त्या निर्णयाच्या विरोधात कामगार न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निर्णय दिला होता. त्या निर्णयाचे विरोधात व्यवस्थापन उच्च न्यायालयात गेले. दरम्यान कंपनीला ऊर्जा विभागामार्फत विद्युत बिल माफ करण्यासाठी १२८ कोटी रूपये अभय योजनेत मार्च २०१७ पर्यंत कारखाना सुरू करण्याचे अटीवर देण्यात आले होते. ऊर्जा विभागाने अनुदान दिल्यावर कंपनीने अ‍ॅक्सीस बँकेकडून कर्ज घेतले होते. कर्ज घेताना व्यवस्थापनाने बँकेसोबत जो करार करून दिलेला होता. मार्चपर्यंत कारखाना सुरू न केल्यामुळे बँकेने लालवाणी या व्यक्तीचे माध्यमातून स्लॅक विकण्याची कार्यवाही सुरू केली आहे.दरम्यान व्यवस्थापन आणि युनियनमध्ये समजोता झाला. न्यायालयीन प्रकरणाबाबत २००६ पासुन कामगारांना नुकसानभरपाई देण्याचा कंपनीने कामगारांसोबत समजोता केला आहे. बँकेने करारपत्रानुसार कर्जरूपाने दिलेले पैसे वसुल करण्यासाठी स्लॅक विकण्याची कार्यवाही सुरू केली असली तरी कारखाना सुरू करण्याबाबत कंपनीने अद्याप निर्णय घेतलेला नाही. आमदार चरण वाघमारे यांनी सांगितले. त्यापूर्वी आ.वाघमारे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे यांची बैठक भेट घेऊन याबाबत चर्चा केली होती. (जिल्हा प्रतिनिधी)