देव्हाडीतील
तुमसर
घटना : १५ जखमी, ७ गंभीर : भरधाव एसटीचे स्टीअरिंग फ्री झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. काही कळण्याच्या आत भरधाव एस.टी. रस्त्यावरून खोल शेतीिशवारात गेली. या अपघातात चालक वाहकासह बसमधील १५ प्रवासी जखमी झाले. सात प्रवाशी गंभीर जखमी झाले असून त्यांना भंडारा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा विचित्र अपघात आज सकाळी ८.३0 च्या सुमारास देव्हाडी शेतशिवारात घडला.तुमसर
-मुंढरी बस क्र.एम.एच. ४0 - ९९४८ तुमसरहून मुंढरीकडे सकाळी ८.३0 ला निघाली. देव्हाडी शिवारात पुलाच्या वळणावर बसचे स्टीअरिंग फ्री झाला. चालकाला काही सुचण्यापूर्वी बस हेलकावे घेऊ लागली. भरधाव एस.टी. रस्त्याला लागून असलेल्या वीज खांब, त्यानंतर झाडाला धडक देऊन खोल खड्यात गेली. या बसमध्ये १७ प्रवासी होते. १५ प्रवासी जखमी झाले असून सात प्रवासी गंभीर जखमी आहेत. यात चालक प्रविण कुंभलकर (२६), रा.तुमसर, वाहक मंगला जांभुळकर (३0) रा.तुमसर, अस्टम महादेव बांते (४0) रा.मोहगाव, सरस्वती निमजे (७0) रा.मुंढरी, उमा बोंदरे (७५) रा.ढोरवाडा, लता बुधे (४५) रा. गोंदिया, सुकवंता केवट(३५) रा.उमरवाडा, मधुकर बुलकर (२५) रा.मुंढरी गंभीर जखमी आहेत. रामवंता मेश्राम (५0) रा.नवेगाव, भूमेश्वरी ठाकरे (३१), रा.तिरोडा, शिया तुरकर (१३), रा.तुमसर, सूर्यकिरण ठाकरे (३0), रा.बेरडीपार, नैतिक ठाकरे (६), रा.बेरडीपार, जयदेव उकेशेंडे (५0), रा.तुमसर, मनिष साकुरे (२६) रा.तुमसर यांचा जखमींमध्ये समावेश आहे.जखमींवर
तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून भंडारा येथे हलविण्यात आले. दि. ३१ मे पासून डॉक्टरांचा संप सुरु असल्यामुळे जखमी कंत्राटी डॉक्टरांनी उपचार केले. पश्चिम
महाराष्ट्रातील भंगार बस गाड्या तुमसर आगाराला देण्यात आल्याची माहिती असून मागील दोन महिन्यांपासून या आगारात अपघात वाढले आहेत. अपघातग्रस्त बसच्या समोरचा टायर पंक्चर झाला आहे. टायर घासलेले आहेत. ‘पेन लिफ’ या तांत्रिक कारणामुळे एस.टी. अनियंत्रीत झाली असे सांगण्यात आले आहे. या अपघातात परिवहन विभागाचे अधिकारी मात्र बोलायला तयार नाहीत. (तालुका प्रतिनिधी)