शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचा अधीक्षक अभियंत्यांना घेराव

By admin | Updated: June 10, 2017 00:17 IST

कर्तव्यावर असलेल्या वीज कर्मचारी संध्या खोब्रागडे यांना विजेचा जिवंत विद्युत प्रवाह लागला. यात त्यांचे दोन्ही हात निकामी झाले.

महिला वीज कर्मचारी भाजल्याचे प्रकरण : दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कर्तव्यावर असलेल्या वीज कर्मचारी संध्या खोब्रागडे यांना विजेचा जिवंत विद्युत प्रवाह लागला. यात त्यांचे दोन्ही हात निकामी झाले. याप्रकरणात दोषी असलेल्या वीज अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवारला वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांना घेराव घातला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांच्या नेतृत्वात हा घेराव घालण्यात आला. सुमारे पाऊण तास हा प्रकार चालला. यावेळी अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. यानंतर ते आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान मनसेने मडावी यांना आठ दिवसाचा "अल्टीमेटम" दिला असून या दिवसात कारवाई न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा शहारे यांनी दिला आहे.राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर वीज वितरण कंपनीचे जनित्र आहे. या जनित्रावर ११ केव्हीच्या विद्युत तारा आहे. या तारांमधील एबी स्विचमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने मागील वर्षभरापासून ती सुरू आहे. याची कल्पना नसल्याने तांत्रिक बिघाड दुरूस्ती करण्याकरिता पोलवर चढलेली वीज कर्मचारी संध्या खोब्रागडे हीचा तारांना स्पर्श झाला. त्यांच्यावरील नागपूर येथील उपचारादरम्यान दोन्ही हात व उजव्या पायाचे बोटे निकामी झाल्याने ते कापावे लागल्याचा दुर्दैवी प्रसंग त्यांच्यावर ओढविला आहे. यात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हेच कारणीभूत असल्याची चर्चा आता वीज कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. याप्रकरणात कार्यकारी अभियंता हिवरकर, सहायक अभियंता अनंत हेमके, वीज कर्मचारी कृष्णा जिभे व अजय कुंदभरे हे दोषी असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. याप्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिभे व कुंदभरे यांना दोषी पकडून केवळ निलंबित केले आहे. मात्र त्यांच्यावर या सर्वांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी मनसेने रेटून धरली आहे.शुक्रवारला अधीक्षक अभियंता मडावी यांना याप्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेराव घेवून कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी मडावी यांनी दोषी कर्मचाऱ्यांवर योग्य ती व तातडीने कारवाई करू, असे आश्वासन दिल्यानंतर घेराव मागे घेण्यात आला. यावेळी विजय शहारे यांच्यासह महिला जिल्हाध्यक्ष मंगला वाडीभस्मे, शोभा बनकर, विभा साखरकर, नितीन वानखेडे, दिनेश बारापात्रे, चोपराम तिवाडे, महादेव बांते, सोमेश्वर शहारे, आयुश चौधरी, शुभम डहाके, गणेश निपाने, दिनेश भोयर, मिलिंद ठाकरे, मनिष पडोळे, गणेश वानखेडे, ग्यानी घाटोळे, मदन गडरीये, प्रणय ढोमणे आदी मनसैनिक उपस्थित होते.