शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

नाबार्डच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: July 13, 2016 01:35 IST

नाबार्डने भंडारा जिल्ह्यासाठी चार आर्थिक साक्षरता केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्राच्या माध्यमातून महिलांना व शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ घेता येतो.

नाबार्डचा वर्धापन दिन : सुनील फुंडे यांचे आवाहन भंडारा : नाबार्डने भंडारा जिल्ह्यासाठी चार आर्थिक साक्षरता केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्राच्या माध्यमातून महिलांना व शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ घेता येतो. या ठिकाणी चांगल्या मार्गदर्शकांना बोलावून व केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत नाबार्डच्या अनेक योजनांची माहिती पोहोचवावी, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी केले. जिल्हा सहकारी बँकेच्या मुख्य शाखेतील आर्थिक साक्षरता केंद्रात नाबार्डचा ३३ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी त्ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, शेतकरी, शेतमजूर, महिला बचतगटांना आर्थिक साक्षरता कळावी, यासाठी नाबार्डची स्थापना करण्यात आली. आर्थिक जागरूकता निर्माण व्हावी, शेतकरी शेतमजूर, बेरोजगार, महिला बचत गटांचा आर्थिक कणा मजबूत व्हावा, त्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जावे, नाबार्डच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी आर्थिक साक्षरता केंद्राची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले. ज्या कामासाठी केंद्र देण्यात आले, त्यासाठी या केंद्राचा उपयोग होत नसल्याने संबंधितांच्या अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी कानपिचक्या घेतल्या. कार्यक्रमाला बँकेचे संचालक नरेंद्र बुरडे, सत्यवान हुकरे, योगेश हेडाऊ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे सरव्यवस्थापक बोबडे यांनी केले तर आभार राम आगलावे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)