शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘यशवंतराज’चे विभक्तीकरण

By admin | Updated: December 3, 2015 01:09 IST

स्थानिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना पुरस्कार देऊन ...

शासन निर्णय : राजीव गांधी पंचायत राज सशक्तीकरण योजनेपासून सुरूवातभंडारा : स्थानिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणाऱ्या यशवंतराव पंचायत राज सशक्तीकरण पुरस्कार योजनेचे राज्य शासनाने यावर्षीपासून केंद्राच्या राजीव गांधी पंचायत राज सशक्तीकरण योजनेपासून विभक्तीकरण केले आहे. राज्य शासनाकडून आता स्वतंत्र पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.२०११ पासून केंद्र शासनाच्या पंचायतराज मंत्रालय व राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्याकडून पंचायत राज अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत होता. राज्य शासनाने गौरव केलेल्या ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांचाच गौरव पुन्हा केंद्र शासनाकडून यापूर्वी करण्यात येत असल्याने अन्य संस्थांनाही संधी मिळावी, या हेतूने राज्य शासनाने राजीव गांधी पंचायत राज सशक्तीकरण अभियानापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.या योजनेतून राज्य शासनाकडून एकूण २ कोटी ७० लाखांची पारितोषिके उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना देण्यात येत आहेत. राज्यस्तरावर निवडण्यात आलेल्या जिल्हा परिषदेसाठी २५ लाख, पंचायत समितीसाठी १७ लाख, तर ग्रामपंचायतीसाठी ७ लाखांचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. द्वितीय क्रमांकासाठी पात्र संस्थांना १५ लाख, १२ लाख, ५ लाख, व तृतीय क्रमांकासाठी पात्र असणाऱ्या संस्थांना अनुक्रमे १० लाख, १० लाख, व ३ लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येत आहेत. विभागीय स्तरावरूनही पारितोषिके देण्यात येत आहेत.केंद्र शासनाने या वर्षीपासून या योजनेतून पुरस्कारासाठी पात्र असणाऱ्या स्थानिक संस्थांना आॅनलाईन माहिती भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे केंद्र शासनाच्या आॅनलाईन प्रणालीनंतर मुल्यमापनानंतर केंद्र शासनाकडून या योजनेतील उत्कृष्ट संस्थांची नावे नंतर जाहिर करण्यात येणार आहेत. राज्य शासनाने यावर्षीपासून ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळविण्यासाठी काही अटी सक्तीच्या केल्या आहेत. शंभर गुणांच्या मुल्यमापनाव्यतिरिक्त ज्या ग्रामपंचायतींची करवसुली ५० टक्कयांपेक्षा कमी आहे, सर्व ग्रामसभांचा कोरम अपूर्ण आहे, सर्व पाणी तपासणी नमूने लाल कार्डात आहेत.मागासवर्गिय कल्याण निधी ७५ टक्केपेक्षा कमी आहे, गावातील एकूण कुटुंबापैकी ५० टक्कयांपेक्षा कमी कुटुंबाकडे शौचालये नाहीत, करांची फेररचना न करणे आदी ग्रामपंचायतींचा समावेश या योजनेच्या पुरस्कारासाठी न करण्यात आदेश देण्यात आले आहेत. नोव्हेंबरअखेरपर्यंत पंचायत समितीकडून चार उत्कृष्ट ग्रामपंचायतीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर विभागीय स्तरावर शिफारस करण्यात येणार आहे. मार्चनंतर या अभियानातील संस्थांची नावे जाहीर करण्यात येणार आहे. (नगर प्रतिनिधी)