शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

नाथजोगी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 05:00 IST

लाखांदूर तालुक्यातील कोदामेढी या नाथजोगी समाजाच्या वस्तीला जिल्हाधिकारी कदम यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना सूचना देत वस्तीतील सर्व समस्या टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यात येतील, असे सांगितले. या वस्तीत जमिनीचे पट्टे, घरकूल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, महिला स्वयंरोजगार, जात पडताळणी प्रमाणपत्र, रेशनकार्ड, आधारकार्ड, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ यासह शैक्षणिक समस्या असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीत पुढे आले. 

ठळक मुद्देसंदीप कदम : लाखांदूर तालुक्यातील कोदामेढी वस्तीचे वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वर्षानुवर्षे अंधकारमय भविष्यासह जगत असलेल्या नाथजोगी समाजाच्या वस्तीत आता विकासाची पहाट उगवणार आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी या वस्तीला भेट देऊन तेथील समस्या ऐकून घेतल्या. नाथजोगी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील, असे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी  ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.लाखांदूर तालुक्यातील कोदामेढी या नाथजोगी समाजाच्या वस्तीला जिल्हाधिकारी कदम यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना सूचना देत वस्तीतील सर्व समस्या टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यात येतील, असे सांगितले. या वस्तीत जमिनीचे पट्टे, घरकूल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, महिला स्वयंरोजगार, जात पडताळणी प्रमाणपत्र, रेशनकार्ड, आधारकार्ड, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ यासह शैक्षणिक समस्या असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीत पुढे आले. या वस्तीतील बहुतांश पुरुष बाहेरगावी भिक्षा मागणे आणि हस्तरेषा पाहण्यासाठी जातात. त्यामुळे लहान मुले आणि महिलाच या वस्तीत बहुतांशवेळा असतात. या मुलांच्या शैक्षणिक भविष्याचा प्रश्नही कायम आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या वस्तीची माहिती मिळताच त्यांनी थेट कोदामेढी वस्ती गाठून तेथील समस्या ऐकून घेत त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या वस्तीत जिल्हास्तरीय अधिकारी पहिल्यांदाच पोहचल्याने नाथजोगींच्या अपेक्षा उंचावल्या आहे.

नाथजोगींना मिळणार जगण्याचे बळ 

जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तीतील अनेक घरांना भेटी दिल्या. तेथील महिला व लहान मुलांशी संवाद साधला. आरोग्याच्या दृष्टीने चौकशी केली. मुलांना नियमितपणे शाळेत पाठवावे, असा आग्रह त्यांनी धरला. अर्धवट शिक्षण सोडण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. आता या समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनीच स्वत: पुढाकार घेतल्याने नाथजोगींना जगण्याचे बळ मिळाले आहे.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी