शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भ्रमणध्वनीच्या परमाणू लहरीमुळे चिमण्या गायब

By admin | Updated: April 19, 2015 00:39 IST

धुळीपासून आता चक्क परमाणू लहरी आणि कीटकनाशकाच्या प्रदूषणामुळे पशू पक्ष्यांवरसुध्दा विपरीत परिणाम होत आहे.

चिवचिवाट बंद : विकासाची प्रगती मानवी जीवनाला अडसर भंडारा : धुळीपासून आता चक्क परमाणू लहरी आणि कीटकनाशकाच्या प्रदूषणामुळे पशू पक्ष्यांवरसुध्दा विपरीत परिणाम होत आहे. पूर्वी पहाटेपासून तर सायंकाळपर्यंत सतत चालणारा चिमण्याचा चिवचिवाट कायमचा बंद झाला. शहरातील सिमेंटच्या जंगलामुळे पक्ष्यांचे निवारे दिसेनासे झाले आहेत. चिमण्यांपाखरासोबत नातीगोती जपणार्यांनी मात्र चिमण्यांचा सहवास मिळावा म्हणून पक्षीप्रेमी नागरिक घरावर कृत्रिम घरटे लावण्याचा उपक्रम राबवितात. पशू पक्षी घरट्यातून बाहेर येत एकच कलह होत होता. तेव्हा पक्षांच्या किलबिलाटामुळे महिला मंडळी सुप्रभाती सडासारवण करीत होत्या. परंतु आता सूर्यवंशमचा जमाना आला. कुणालाही सडासारवण करण्याची गरज वाटत नाही. त्या भूपाळीसुध्दा काळाच्या पडद्याआड गेल्या. विज्ञानाने सर्वच क्षेत्रात प्रगती करुन मानवाला ऐहिक सुखाच्या विळख्यात सापडले आहे. परंतु तेवढेच दुष्परिणामसुध्दा वाढले, मानवी जीवन विविध आजाराने वेढला गेला. विकासाची प्रगती मानवी जीवनाला अडसर ठरत आहे.निसगार्तील पशुपक्षी काळाच्या पडद्याआड जात आहे. जंगलात पिकावर होत असलेल्या विषारी कीटकनाशकाच्या फवारणीमुळे पक्ष्यांचे खाद्य अळयासुध्दा नाहीशा झाल्याने पशुपक्ष्यांवर उपासमारी येऊ लागली आहे. ग्रामीण भागातील चिमण्या केवळ बोटावर मोजण्याइतक्याच राहिल्या आहेत. शहरी भागात सिमेंट रस्ते आणि मोठया इमारतींमुळे सिंमेटचे जंगल तयार झाल्याने शहरातील चिमण्यांचा चिवचिवाट नाहीसा झाला. पर्यावरणवाद्यांनी चिंतन करण्याची वेळ आली आहे. भ्रमणध्वनीसुध्दा याला कारणीभूत असल्याचे काहींचे मत आहे. याकरिता काही पक्षीप्रेमी, निसर्गप्रेमी घरासमोर घरटे व पाण्याची व्यवस्था करुन चिमणी पाखरांना निवारा देण्याचा प्रयत्न करीत आहेत.(नगर प्रतिनिधी)