शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
3
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
4
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
5
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
7
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
8
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
9
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
10
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
11
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
12
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
13
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
14
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
15
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
16
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
17
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
18
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
19
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
20
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल

व्यथा सूर नदीची : नागरिकांची पाण्यासाठी एकच धावपळ

By admin | Updated: July 14, 2014 00:19 IST

लहान ओढे, नद्या सोबतच बंधारे कोरडेच आहे. मोहाडीची सूर नदी आटून दीड वर्ष झाली.

राजू बांते  मोहाडी लहान ओढे, नद्या सोबतच बंधारे कोरडेच आहे. मोहाडीची सूर नदी आटून दीड वर्ष झाली. सूरनदीत पाणी नसण्याचा फायदा रेती उपसा करणाऱ्यांनी चांगला घेतला. त्यांना दीड महिन्याचा नदीचा कोरडा असलेला पात्र कोट्यावधी कमावून गेला. दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नदीवर अवलंबून असलेली गावेही पावसाची वाट पाहत आहेत.‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा, पाऊस आला मोठा...’ हे बालगीत आता सर्वांनाच आठवू लागले आहे. कोरडी झाली नदीही आपल्या वेदना मुकाटपणे सहन करीत मोठा पाऊस कधी पडतो याची प्रतीक्षा करीत आहे.पावसाने कायमची पाठ फिरवली की काय? अशी अवस्था आहे. दररोज नजरा आकाशाकडे वळताहेत. पण, पावसाचा थांगपत्ता नाही. पावसासाठी सारेच कासावीस झाले आहेत. उन्हाळ्यासारखी सदृश्य परिस्थिती आहे. घराघरात थंडी देणारे संयंत्र सुरु आहेत. वातावरणाचा प्रभाव शाळेवरही झाला आहे. शिक्षण विभागाने शाळा सकाळपाळीच्या ठेवण्याच्या सूचना शाळा प्रमुखांना दिल्या आहेत. एकुणच ही परिस्थिती विपरीत झाली आहे. पावसासाठी शेतकरी आपापल्या पद्धतीने आराधना करीत आहे. पण वरूण राजाला दया येत नाही. दररोज सकाळचा दिवस लख्ख प्रकाशाने होतो. अशीच पाऊस न येण्याची परिस्थिती राहिली तर शेतकरी व सामान्याच्या घरात हाहा:कार निर्माण होण्याची शक्यता आहे. जुलैचा पंधरवडा उलटला आहे. महत्वाच्या पावसाची नक्षत्रे निघून गेली आहे. पावसाला मात्र जोर नाही. नाले, नद्या पाण्यासाठी आसूसलेल्या आहेत. नदीच्या पाण्याची भूख कायम आहे. भर पावसाळ्यात नदीच्या पात्रात चटके बसताहेत. नदीचा दाह तसाच आहे. आज सुर नदी सारख्या अनेक नद्या पावसाविना वेदना सहन करीत आहे. या नद्यांची तृष्णा कधी भागते हे निसर्गावर अवलंबून आहे. नद्यांची तहान पाण्याने भागली. नाही तर लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागणार आहे. मोहाडीसाठी खोडगाव, सुरनदी येथून पाणी पुरवठा होतो. नदीच्या पात्रातच पाणी नाही तर लोकांची तहान कशी भागणार ही चिंता आतापासून सुरु झाली आहे. पाण्याची आस पूर्ण झाली तरच पुढचं सर्व काही व्यवस्थित होईल, अशी आस आहे.