शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सोनी हत्याकांडाची सुनावणी आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2017 00:27 IST

तीन वर्षांपूर्वी तुमसर शहरातील रामकृष्ण नगरातील रहिवासी तथा सराफा व्यापारी संजय सोनी यांच्या घरी दरोडा घालुन त्यांची पत्नी व मुलाची हत्या करण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा/तुमसर : तीन वर्षांपूर्वी तुमसर शहरातील रामकृष्ण नगरातील रहिवासी तथा सराफा व्यापारी संजय सोनी यांच्या घरी दरोडा घालुन त्यांची पत्नी व मुलाची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाची सुनावणी सोमवारपासून (१९ जून) येथील जिल्हा व सत्र न्यायलयात सुरू होत आहे. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज तुमसर येथे जावून सोनी यांच्या घराला भेट देवून पाहणी व कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यानंतर ते भंडाऱ्यात येऊन सुनावनी संदर्भात पोलिस तपासाची इत्थ्यंभूत माहिती याबाबत अधिका-यांशी चर्चा केली. सोमवारी होणाऱ्या सुनावणीसाठी अ‍ॅड. निकम उपस्थित राहणार आहेत. तत्कालीन गृहमंत्री स्व.आर.आर. पाटील यांनी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची शिफारस खटला चालविण्याकरिता केली होती. आरोपींविरुद्ध भादंवि ३०२ खून करणे, ३९६ खुनासह दरोडा, ४४९ मृत्यूच्या शिक्षेचा गुन्हा करण्याकरिता गृहप्रवेश, १२० फौजदारी कट रचणे, २०१ पुराने नष्ट करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या आरोपपत्रात ९९ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्याची माहिती आहे. सोनी यांच्या कुटुंबातील एकमेव त्यांची मुलगी हिरल सोनी बचावली. अशी घडली होती घटना सदर हत्याकांड २७ फेब्रुवारी २०१४ ला घडले होते. तुमसर शहरातील रामकृष्ण नगरातील सोनी यांच्या घरी सात दरोडेखोरांनी दरोडा घातला होता. यात संजय सोनी (४७) यांचा तिरोड्याजवळ रात्री गळफास लावून खून केला. नंतर तुमसर येथील घरी पत्नी पूनम सोनी (४३) व मुलगा द्रुमील (११) यांची हत्या केली होती. तुमसर येथून ४ व नागपूरातून ३ आरोपींना २४ तासात पोलीसांनी अटक केली होती. हे हत्याकांड राज्यात गाजले होते. पोलीसांनी २०१५ मध्ये ८०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.