शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

सोनी हत्याकांडाची सुनावणी एप्रिल महिन्यात सुरू होणार

By admin | Updated: March 18, 2015 00:46 IST

येथील सराफा व्यापारी संजय सोनी, त्यांची पत्नी पुनम व मुलगा द्रुमिल यांच्या हत्या प्रकरणाची ट्रायल (सुनावणी) भंडारा येथील फास्ट ट्रॅक कोर्टात...

तुमसर : येथील सराफा व्यापारी संजय सोनी, त्यांची पत्नी पुनम व मुलगा द्रुमिल यांच्या हत्या प्रकरणाची ट्रायल (सुनावणी) भंडारा येथील फास्ट ट्रॅक कोर्टात (जलद न्यायालय) पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम येथे आपला पक्ष मांडणार आहेत. तत्पूर्वी २७ मे २०१४ ला पोलिसांनी तुमसर न्यायालयात ८०० पानांचे सात आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल केले होते. बहुचर्चित तिहेरी हत्याकांड राज्यभरात गाजले होते.२६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री येथील प्रसिद्ध सराफा व्यापारी संजय सोनी, पत्नी पुनम व मुलगा दु्रमिल या तिघांची हत्या सात दरोडेखोरांनी केली होती. २७ फेब्रुवारी रोजी आरोपीविरूद्ध भादंवि ३०२ खून करणे, ३९६ खूनासह दरोडा, ४४९ मृत्यूच्या शिक्षेचा गुन्हा करण्याकरीता गृहप्रवेश, १२० फौजदारी कट रचणे व २०१ पुरावे नष्ट करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुमसर पोलिसांनी या दरोडा प्रकरणात एकूण ९ कोटी ९ लाख रूपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला होता. या प्रकरणात फाशीची शिक्षेची कलमे आहेत. हा तिहेरी खून खटला जलद न्यायालयात आहे. पोलिसांनी सर्व सोपस्कर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या मार्गदर्शनात पूर्ण केले आहे. ८०० पानांच्या आरोपपत्रात सर्व पुरावे, साक्ष, मुद्देमाल, साहित्य, ओळख याची जुळवाजुळव करण्यात आली.एप्रिल महिन्यात हा खटला भंडारा येथील जलद न्यायालयात सुरू होत आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी तशा तारखा सुनावणी करीता दिल्या आहेत. प्रथम निकम आपला पक्ष न्यायालयात मांडणार आहेत.पुढील तीन ते चार महिन्यात या खटल्याचा निकाल येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुर्मिळातल्या दुर्मिळ खटल्यात फाशीची शिक्षा सुनाविण्यात येते. सोनी कुटूंबातील तिघांची हत्या अत्यंत निर्दयतेने सात आरोपींनी केली होती. विशेष सरकारी वकील उज्वल निकम भंडारा कोर्टात खटल्याकरिता दुसऱ्यांदा येत आहेत. प्रथम ते देशभर गाजलेल्या खैरलांजी हत्याकांड प्रकरणी आले होते. (तालुका प्रतिनिधी)