शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सौंदड, खापरी पुनर्वसनातील समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 23:44 IST

सौंदड, खापरी पुनर्वसनातील समस्या मार्गी लावण्याची मागणी गोसे खुर्द प्रकल्पबाधीत सौंदड, खापरी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अन्यथा कुटुंबीयांसह रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

प्रकाश हातेल।आॅनलाईन लोकमतचिचाळ : सौंदड, खापरी पुनर्वसनातील समस्या मार्गी लावण्याची मागणी गोसे खुर्द प्रकल्पबाधीत सौंदड, खापरी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. समस्या १५ दिवसात मार्गी न लावल्यास प्रकल्पग्रस्त कुटूंबियासह रसस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी, आयुक्त पुनर्वसन नागपूर व मुख्य अभियंता गोसे खुर्द यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प आहे. त्यामुळे पुनर्वसन राष्ट्रीय पुनर्वसन धोरणाप्रमाणे करावे, प्रकल्पात ८५ गावे आणि १९,५६५ हे.आर. सुपिक जमीन ब्रिटीशकालीन १८९४ कायद्यान्वये संपादीत झाली आहे. मात्र या कायद्याविरोधात ज्या शेतकºयांनी जिल्हा न्यायालय व नागपूर न्यायालयात दाद मागितली त्यांना प्रतीहेक्टरी १० ते १५ लाख रुपये मोबदला मिळाला. त्याच प्रमाणे उर्वरीत शेतजमिनीला १० लाख रुपये मोबदला देण्यात यावा, दि.१८ जून २०१३ ला विशेष पॅकेज मध्ये प्रती एकर ८० हजार रुपये दिले. त्याऐवजी ८ लाख रुपये प्रती एकरी द्यावे, तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार बाधीत कुटुंबांना शासकीय नोकरी किंवा त्याऐवजी २५ लाख रुपये देण्यात यावे, गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त मासेमारांना जलाशयामध्ये मासेमारीचे अधिकार देवून आधुनिक व तंत्र व प्रशिक्षण द्यावे, प्रकल्पग्रस्तांना बीपीएलमध्ये समाविष्ट करावे, प्रकल्पग्रस्तांना वृद्धापकाळाची पेंशन, विधवा, निराधार, दिव्यांग यांना आजीवन पेंशन देण्यात यावी, पुनर्वसीत गावठाणात सर्व नागरी सुविधा दर्जेदार व टिकावू स्वरुपाच्या करून द्याव्यात, धरणावर चालणाऱ्या सर्व उद्योगाच्या सीएसआर फंडातून थेट निधी संबंधित ग्रामपंचायतींना सन २०५५ पर्यंत देण्यात यावी, प्रकल्पग्रस्त आणि त्यांच्या पाल्यांना शिक्षण व उच्चशिक्षण प्राधान्याने आणि मोफत देण्यात यावी, गावठाणात संपूर्ण मागण्या व नागरी सुविधा झाल्याशिवाय विद्युत बिल व घरटॅक्स भरणार नाही, नवीन गावठाणात उन्हाळ्यात विहिरी आटत असल्याने घरबांधणी व पाण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात यावी, गावठाणाला लागून असलेली स्मशानभूमी लोकभावनेच्या दृष्टीने ही जागा बदलून गावापासून दीड कि.मी. अंतरावर देण्यात यावी, समाजमंदिर, शाळा, ग्रा.पं. प्रांगणात मुरुम टाकून सपाटीकरण करून द्यावे, कलम ४ नंतर बांधकाम केलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण करून त्याचा लाभ संबंधित कुटुंबांना देण्यात यावा, वाढीव कुटुंबांना नवीन शासन धोरणानुसार पॅकेजचा पूर्ण लाभ देण्यात यावाआदी मागण्यांचा समावेश आहे.शिष्टमंडळात राजहंस भुते, भीमराव आडकिने, मुकुंदा गजभिये, बुधा भुते, रिमराज सेलोकर, भाऊराव सेलोकर, आदेश गजभिये, भाऊराव भुते, वसंत मेश्राम, प्रेमलाल मेश्राम, चंद्रभान भुते, डी.सी. केवट, काशिनाथ रामटेके, शालीक भुते, सुनिल भुते, सखाराम तितीरमारे, लक्ष्मण तितीरमारे, भीमाबाई बोरकर, कवळू भुते, पुरुषोत्तम भुते, सहादेव गरपडे, भारत मारबते, मनोहर मारबते, ताराचंद भुते, नाशिक खंगार आदी प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.