शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय शिक्षकांच्या समस्या मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:22 IST

गोंदिया : जिल्ह्यातील मागासवर्गीय शिक्षकांचे प्रश्न व समस्या निकाली काढण्यासाठी कास्ट्राइब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके यांच्या नेतृत्वात ...

गोंदिया : जिल्ह्यातील मागासवर्गीय शिक्षकांचे प्रश्न व समस्या निकाली काढण्यासाठी कास्ट्राइब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके यांच्या नेतृत्वात मुख्य लेखा व वित्त अधिकारी अश्विन वाहने यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावर वाहने यांनी शिक्षकांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. चर्चेला उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक बागडे उपस्थित होते.

शिक्षकांचे सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे अविलंब निकाली काढण्यात यावे, जी.पी.एफ.धारक शिक्षकांना पावत्या देण्यात याव्या, १ नोव्हेंबर २००५ व त्यानंतर सेवेत लागलेल्या शिक्षकांना डी.सी.पी.एस. कपातीचे वितरण आर-३ मध्ये (कर्मचारी अंशदान शासन अंशदान व्याज) देण्यात यावे, जी.पी.एफ.धारक शिक्षकांचा सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा व तिसरा हप्ता जमा करण्यात यावा तसेच डी.सी.पी.एस.धारक शिक्षकांना रोखीने देण्यात यावा, जिल्हा परिषदेत विविध कामाकरिता आलेल्या सेवापुस्तिका निकाली काढून संबंधित पंचायत समितीला पाठविण्यात याव्या, शिवणी येथील सहायक शिक्षक अंकुश मेश्राम यांचे सहाव्या वेतन आयोगाचे तीन हप्ते त्वरित जमा करण्यात यावे, यासह इतर मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावर वाहने यांनी समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात विरेंद्र भोवते, उत्क्रांत उके, अविनाश गणवीर, संघटक नागेश खांडेकर, प्रमोद भांदककर उपस्थित होते.