शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

उपाययोजना कागदोपत्री

By admin | Updated: July 5, 2015 00:41 IST

आगीमुळे इमारतीत दुर्देवी घटना घडू नये, यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश शासनाचे परिपत्रक निर्गमित करून

सार्वजनिक इमारती असुरक्षित : निधीचाही वाणवासाकोली : आगीमुळे इमारतीत दुर्देवी घटना घडू नये, यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश शासनाचे परिपत्रक निर्गमित करून सर्व शासकीय कार्यालयसह इतर कार्यालयांना दिले आहे़ यानुरूप महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ नियमा अंतर्गत शासकीय निमशासकीय संस्था व सार्वजनिक वापराच्या इमारतीमध्ये उपाययोजना करणे गरजेचे आहे़ मात्र तालुक्यात याकडे उघडपणे दुर्लक्ष केले आहे़सार्वजनिक क्षेत्रातील सर्व कार्यालये असुरक्षीत आहेत़ यामुळे जनता आगीच्या घटनापासून असुरक्षीत असल्याची बाब अग्निशमन व आणी बाणी सेवा विभागाने निर्दशनास आणून दिली़ काही महिन्यापुर्वी तालुक्यातील अनेक कार्यालये व संस्थाना स्मरणपत्र देवून नोंदणीकृत अनुज्ञाप्तीधारक अभिकरणाकडून प्रमाणपत्र घ्यावे, असे कळविले आहे़ मात्र पत्रालाही तालुक्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व व्यापारी यांनी केराची टोपली दाखविली आहे़ तालुक्याचा मुख्य केंद्र साकोली आहे़ शहराची लोकसंख्या लाखोच्या घरात पोहचली आहे़ शहरात दिवसेंदिवस नागरिकाची वसाहतीस, व्यापारी इमारतीची संख्या वाढत चालली आहे़ तालुक्याच्या निर्मितीनंतर शासकीय, निमशासकीय व सार्वजनिक संस्थाच्या कार्यालयाची संख्या वाढली़ शहरात शासकीय कार्यालयाच्या १० इमारती आहेत व निमशासकीय कार्यालयाच्या २५ हून अधिक इमारती आहेत़ त्याचप्रमाणे सार्वजनिक वापरात येणारे सभागृह, लॉन, लॉज, विश्रामगृह, सार्वजनिक वाचनालये, शाळा, महाविद्यालये, कारखाने त्याचप्रमाणे लहान मोठे उद्योगाचे गोडावून आहेत़ महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ अंतर्गत सर्व इमारतीमध्ये आगीपासून होणाऱ्या दुर्देवी घटनापासून आळा घालण्यासाठी उपाययोजना गरजेचे आहे़ नगर विकास विभागाच्या निर्देशानुसार शासकीय, निमशासकीय संस्था व सार्वजनिक उपक्रमाच्या कार्यालयाच्या अग्नीसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण अग्निशमन सेवा विभागाचे संचालक याच्याकडून नोंदणीकृत केलेले अनुज्ञाप्तीधारक अनुकरण करणे गरजेचे आहे़ मात्र याकडे अधिकाऱ्यासह, व्यापाऱ्यानी दुर्लक्ष केले आहे़ तालुक्यातील एकाही शासकीय कार्यालयाच्या इमारतीत तसेच सार्वजनिक संस्थांच्या कार्यालयात उपाययोजना करण्यात आली नाही़ त्यामुळे सर्व कार्यालये उपाययोजनेपासून असुरक्षित आहेत़ (तालुका प्रतिनिधी)