नागपूर पदवीधर मतदार संघ : प्रचारात आघाडीनागपूर : नागपूर पदवीधर मतदार संघाचे भाजप-शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार प्रा. अनिल सोले यांना दलित संघटनांनी समर्थन जाहीर केले आहे. विविध संघटनांच्या बळाने त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. नागपूर विभागाच्या पदवीधर मतदार संघाचे भाजपा-शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार अनिल सोले यांना भारतीय दलित पँथरने समर्थन जाहीर केले असल्याची माहिती विदर्भप्रमुख सिद्धार्थ कुर्वे यांनी दिली. यावेळी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्री पद्मशेष (नागद्वार) सेवा मंडळाने सोले यांना समर्थन जाहीर केले. मंडळाचे अध्यक्ष मधुकरराव महाकाळकर व पदाधिकाऱ्यांनी सोले यांना जाहीर समर्थनाचे पत्र सादर केले. यावेळी रामकृष्ण गुल्हाने, गोविंदराव गुरमुळे, उत्तमराव देशमुख, महादेव श्रीखंडे आदींची उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेच्या बैठकीत अनिल सोले यांना समर्थन जाहीर करण्यात आले. बैठकीला जिल्हाप्रमुख प्रमोद लोणारे, अध्यक्ष बंडू पोटे, कार्याध्यक्ष प्रमोद वानखेडे, महामंत्री दिलीप चरपे, कोषाध्यक्ष टेमराज माले, उपाध्यक्ष रेखा कडू, खुशाल कापसे, भूपेश चौहान, इकबाल शेख, यशवंत राऊत, राजकुमार पचारे, सुभाष घवघवे, प्रकाश वैरागडे, ओंकार पाटील, वसंत गोमासे, वंदना खसाले, नरेंद्र बोडाले, सुरेश कुथे, नरेंद्र किलकर, योगेश भुरसे, मोरेश्वर डहाले, रेखा डाहके, राजू बोचरे, राजू यावलकर आदींसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.(प्रतिनिधी)
सोलेंना संघटनांचे बळ
By admin | Updated: June 18, 2014 00:04 IST