शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्य प्रशिक्षण काळाची गरज

By admin | Updated: May 14, 2016 00:30 IST

कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे उद्योगासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण होईल. रोजगार व स्वयंरोजगाराची निर्मिती होऊन बेरोजगारीला आळा घालता येईल.

देवतळे यांचे प्रतिपादन : भंडारा नगर पालिकेचा उपक्रमभंडारा : कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे उद्योगासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण होईल. रोजगार व स्वयंरोजगाराची निर्मिती होऊन बेरोजगारीला आळा घालता येईल. नगर परिषद अंतर्गत सुरू असलेल्या दिनदयाळ अंत्योदय योजना, उपजिविका अभियानांतर्गत कौशल्य विषयाचे तरूण-तरूणींनी प्रशिक्षण घेण्याचे आवाहन करून कौशल्य प्रशिक्षण काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्याधिकारी रवींद्र देवतळे यांनी केले.जिल्हा कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व राष्ट्रीय नागरी उपजीिवका अभियानांतर्गत नगर परिषद आणि राबीया मॉयनारीटी एज्युकेशन सोसायटीच्या विद्यमाने कौशल्य प्रशिक्षण मेळावा बाबा मस्तानशहा वॉर्डातील कम्युनिटी हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. उद्घाटन हाजी अब्दुल सलाम पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक संचालक बालाजी मरे, सहायक प्रकल्प अधिकारी प्रवीण पडोळे, अशपाक पटेल, साकाबुद्दीन खान, अनिक जमा उपस्थित होते. यावेळी बालाजी मरे म्हणाले, कौशल्य उद्योजकता अभियानांतर्गत शासनाकडून विविध योजना सुरू आहेत. या योजना शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचता यावी. याकरीता कौशल्य मेळावे आयोजित करणे आवश्यक आहे. हे प्रशिक्षण नि:शुल्क असून लाभार्थ्यांनी आपल्या गरजेनुसार प्रशिक्षण विषयाची निवड करुन सफलता पूर्वक प्रशिक्षण पूर्ण करावे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांना एन.सी.व्ही.टी.चे प्रमाणपत्र देण्यात येते. यावेळी प्रवीण पडोळे म्हणाले, राष्ट्रीय उपजीविका अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या ३४५ लाभार्थ्यांचे विविध विषयांतर्गत प्रशिक्षण सुरु करण्यात आले असून त्यापैकी २४७ लाभार्थ्यांचे मार्च २०१६ अखेर प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले असल्याचे सांगितले. व्यक्तिगत रोजगार सुरू करण्याकरिता स्वयंरोजगार कार्यक्रमांतर्गत भांडवल उपलब्ध करून देण्यात येते. लाभार्थ्यांनी या अभियांनातर्गत घेतलेल्या कर्जावरील सहा टक्के व्याजावरील अनुदान देण्यात येते. शहरातील बेरोजगार युवक-युवतींनी बाजारातील औद्योगिक गरजेनुसार व आवश्यकतेनुसार कौशल्य प्रशिक्षण, रोजगार स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाईल, असेही सांगितले. सदर कौशल्य प्रशिक्षण मेळाव्यात २५० लाभार्थी उपस्थित होते. त्यापैकी ९० बेरोजगार युवक- युवतींनी विविध प्रशिक्षणामध्ये आपल्या नावाची नोंद केली. प्रास्ताविक राजू पटेल यांनी केले. मेळाव्यासाठी शहर अभियान कक्षाचे व्यवस्थापक अनिल जिरापुरे, समुदाय संघटक उषा लांजेवार, रेखा आगलावे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)