शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

सिंदपुरीत कासवगतीने शेडची उभारणी

By admin | Updated: September 4, 2014 23:34 IST

सिंदपुरी गावात आपादग्रस्तांच्या निवाऱ्याची सोय करण्यासाठी टिनाचे शेड उभारण्यात येत आहेत. या शेड उभारण्याच्या कामाला कासवगती आहे. समाज मंदिरात आपादग्रस्तांनी पोळा सण साजरा केला असताना दिवाळीही

रंजित चिंचखेडे - चुल्हाडसिंदपुरी गावात आपादग्रस्तांच्या निवाऱ्याची सोय करण्यासाठी टिनाचे शेड उभारण्यात येत आहेत. या शेड उभारण्याच्या कामाला कासवगती आहे. समाज मंदिरात आपादग्रस्तांनी पोळा सण साजरा केला असताना दिवाळीही यात जाणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.सिंदपुरी गावात अतिवृष्टीच्या पाण्याने तलावाची पाळ फुटली. विसर्ग होणारे पाणी गावात शिरले. १७३ कुटुंबाचे संसार प्रभावित झाले. तर अनेकांचे घर कोसळले.आपादग्रस्त नागरिकांना गावातील शाळा व समाज मंदिरात आश्रय देण्यात आलेला आहे. या घटनेला महिनाभराचा कालावधी पूर्ण होत आहे. परंतु ठोस मदत गावकऱ्यांना मिळाली नाही. सुरुवातीपासून गावकऱ्यांचे संकट शासनाने गांभीर्याने घेतले नाही. सामाजिक संस्थांच्या मदतीने आपादग्रस्तांना सावरण्याचा प्रयत्न होत आहे. माळीणच्या भूस्खलनात संपूर्ण सरकार मदतीला धावून गेली आहे. परंतु सिंदपुरीच्या आपादग्रस्तांना साधे सांत्वना देण्याचे टाळण्यात आले आहे. गावातील आपादग्रस्तांना मदत तथा शासकीय अनुदान वाटपाची जबाबदारी महसूल विभागाला देण्यात आलेली आहे. पावसाळा सुरु असताना अतिवृष्टीग्रस्तांना सानुग्रह मदत वाटपासाठी तालुक्याला अंदाजे ३ लक्ष रुपये देण्यात आले आहे. ही राशी महसूल विभागाने सिंदपुरीच्या आपादग्रस्तांना मदत वाटपात खर्च केली आहे. या नागरिकांना खावटी तथा अन्य मदतीसाठी देण्यात आलेली आहे. परंतु या उलट महसूल विभागालाच धारेवर धरले जात आहे. तालुका म हसूल विभागाला शासन मदत वाटपासाठी निधी देत नाही. निधी खेचून आणण्यासाठी जिल्हा प्रशासन तथा लोकप्रतिनिधी गंभीर नाहीत. यात महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा दोष नाही. गावकऱ्यांना न्याय देण्यासाठी निधीची प्रतीक्षा या कर्मचाऱ्यांना आहे.पाण्याने बाधीत घरे तथा शेतीचे सर्व्हेक्षण शासकीय अनुदान वाटपाची जबाबदारी महसूल विभागाला देण्यात आलेली आहे. पावसाळा सुरु असताना अतिवृष्टीग्रस्तांना सानुग्रह मदत वाटपासाठी तालुक्याला अंदाजे ३ लक्ष रुपये देण्यात आले आहे. ही राशी महसूल विभागाने सिंदपुरीच्या आपादग्रस्तांना मदत वाटपात खर्च केली आहे. या नागरिकांना खावटी तथा अन्य मदतीसाठी देण्यात आलेली आहे. परंतु याउलट महसूल विभागालाच धारेवर घेतले जात आहे. तालुका महसूल विभागाला शासन मदत वाटपासाठी निधी देत नाही. निधी खेचून आणण्यासाठी जिल्हा प्रशासन तथा लोकप्रतिनिधी गंभीर नाहीत. यात महसूल विभागातील कर्मचाऱ् यांचा दोष नाही. गावकऱ्यांना न्याय देण्यासाठी निधीची प्रतिक्षा या कर्मचाऱ्यांना आहे. पाण्याने बाधीत घरे तथा शेतीचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. अंतिम याद्या तयार आहेत. तालुका प्रशासनाने या याद्या जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. गावात या आपादग्रस्तांना निवारा देण्यासाठी २५ टिनाचे शेड उभारण्यात येत आहेत. अती गरजू आपादग्रस्तांना टिनाचे शेड वाटप करण्यात येणार आहेत. या शेडमध्ये कुटुंबियांची गैरसोय होणार आहे. टिनाचे शेड उभारणीच्या कामाला कासवगती आहे. आजघडीला फक्त ६ टिनाचे शेड तयार झाली आहेत. उर्वरीत शेड उभारणीचा थांगपत्ता नाही.टिनाचे शेड निर्मितीसाठी साहित्याचा पुरवठा संस्थाकडून होत आहे. सामाजिक बांधीलकी जोपासत असल्याचा उदोउदो करण्यात येत आहे. या कामावर महसूल विभागाचे नियंत्रण आहे. परंतु साहित्याचा पुरवठा निकृष्ट होत असल्याचे नियंत्रण ठेवणारे कर्मचारी हैराण झाली आहेत. टिनाच्या पत्र्यांना छिद्र आहेत. अनेक पत्र्यांना गंज लागलेला आहे. हे टिनाचे पत्रे कधी कोसळतील याचा नेम नाही. गावकऱ्यांना जलद गतीने मदत वाटपात जिल्हा प्रशासनाकडून उदासीनता दिसून आली आहे.