शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
4
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
5
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
6
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
7
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
8
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
10
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
11
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
12
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
13
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
14
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
15
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
16
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
17
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
18
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
19
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
20
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

शिवतीर्थावर उसळला भक्तांचा जनसागर

By admin | Updated: January 17, 2016 00:41 IST

लाखनी तालुक्यातील पालांदूर नजीकच्या चुलबंध नदी काठावरील शिवतीर्थावर मकरसंक्रांतीच्या पर्वावर हर्षाेउल्हासात यात्रा उत्सव मोठ्या भक्तीभावाने पार पडला.

भक्तांची मांदियाळी : नदीपात्रात तरूणाईचा जल्लोषमुखरू बागडे पालांदूरलाखनी तालुक्यातील पालांदूर नजीकच्या चुलबंध नदी काठावरील शिवतीर्थावर मकरसंक्रांतीच्या पर्वावर हर्षाेउल्हासात यात्रा उत्सव मोठ्या भक्तीभावाने पार पडला. खुनारी/ खराशी चुलबंध काठावरील शिवमंदिरात हभप बांगरे महाराज यांनी भक्तांकरिता आध्यात्मीक धडे देत प्रवचनातून मकरसंक्रातीचे महत्व विशद केले. दिव्य आयुष्य प्राप्तीकरीता प्रत्येक मानवाने कर्मदृष्टी प्रगत ठेवण्याचे आवाहन केले. निर्वासनीपणा माणसाला सुदृढ आयुष्य देतो. सदा हसतमुख जगा, जीवनात गुरूला महत्व द्या आदी अनेक पैलू तीन तासाच्या संगितमय प्रवचनात भक्तांना मंत्रमुग्ध केले. पौष महिन्याच्या आरंभाला सुर्य मकरराशीत प्रवेश करतो. सुर्याचे भ्रमण तिळाएवढ्या अंतराने वाढत जाते. त्यामुळे दिवस मोठा व रात्र लहान होते. याच पर्वाला मकरसंक्रांत म्हणतात. दक्षिणेकडील लोक यालाच पोंगल म्हणतात. शुभसंदेशाने एकमेकांना शुभेच्छा देत तिळ गुळ घ्या व गोड गोड बोला असा मराठी संस्कृतीचा संदेश स्त्री, पुरूष एकमेकांना देत आपआपसातील भेदभाव, दुरावा विसरून नव्या तेजाने व दमाने जगण्यातला गोडवा वाढवून मोठ्या हर्षाेत्सवाने भक्तगण, तरूणाई शिवतीर्थावर जमली होती. अगदी सकाळपासूनच शिवतीर्थावर गर्दी वाढत होती. लहान मोठे व्यापारी, खेळणीचे दुकान, फळ, रसवंती, हॉटेल यांची शिवतीर्थावर आदल्या दिवसापासूनच उपस्थिती होती. माजी आमदार हेमकृष्ण कापगते यांनी आरोग्य शिबिर घेऊन भक्तांना सेवा दिली. शिवतीर्थावर भक्तांच्या सोईकरीता खराशी, खुनारी, दिघोरी येथील ग्रामस्थांनी आठ दिवसांपासून डेरेदाखल राहत सेवेकरीता प्रयत्न केले. पालांदूरचे ठाणेदार खंडाते, पियुष बाच्छल. वाहतूक पोलीस गजानन नेमाडे यांनी सहकार्यांच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवत शांतता कायम ठेवित वाहतूक सुरळीत ठेवली. शिवतीर्थाला आमदार बाळा काशिवार, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य उमराव आठोडे, पंचायत समिती सदस्या गाढवे, उपसरपंच महादेव निंबार्ते, शिक्षक यशवंत सेलोकर यांनी भेट देत शिवजींचे दर्शन घेत जनतेला मार्गदर्शन केले. दहीकाला फोडून कार्यक्रमाला गोड करण्यात आला. संचालन सुधन्वा चेटूले, प्रास्ताविक सरपंच हेमंत सेलोकर खुनारी, आभार जितेंद्र कठाणे उपसरपंच पाथरी यांनी केले. (वार्ताहर)