शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

सेनेच्या आंदोलनकर्त्यांना अटक-सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2016 00:42 IST

सरकारने शेतकरी व सामान्य जनतेची दिशाभूल केली. याशिवाय सोंड्याटोला उपा सिंचन प्रकल्पाला शासनाच्या दिरंगाईचा फटका बसला असता....

प्रकरण सिहोऱ्यात रास्ता रोको आंदोलनाचे : २६ आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल चुल्हाड (सिहोरा) : सरकारने शेतकरी व सामान्य जनतेची दिशाभूल केली. याशिवाय सोंड्याटोला उपा सिंचन प्रकल्पाला शासनाच्या दिरंगाईचा फटका बसला असता शिवसेना कार्यकर्त्यांनी सिहोऱ्यात रास्ता रोको व जेलभरो आंदोलन केले. यात २६ कार्यकर्ते व शेतकरी विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. आंदोलनकर्त्यांची रात्री उशिरा अटक व सुटका करण्यात आली.रेंगेपारच्या पुनर्वसनाच्या मागणी वरून राजकीय पुढाऱ्यांनी वैनगंगा नदी घाटात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला होता. तेच आता खासदार व आमदार झाली आहेत. याशिवाय केंद्र व राज्यात सत्ता असताना घरकुलाचां प्रश्न सोडविण्यात येत नाही. तुुमसरच्या निवडणूक प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी सिंदपुरी वासियांची घरकुल व तलाव दुरूस्तीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले होते. परिसरात विज पुरवठा करणारे तीन फिडर बंद आहेत. यामुळे नागरिकांना अल्प दाब विजेचा पुरवठा होत आहे. विजेच्या लपंडावाचे रोजचेच गाऱ्हाणे नागरिकांचे आहेत. जिल्ह्यात एकाच पक्षाचे तीन आमदार असताना बंद असणाऱ्या चांदपुर पर्यटन सुरू करण्यासाठी प्रयत्न केले नाही. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाला १५ लाखांचा निधी देण्यात आल्याचा गवगवा होत आहे. निधी खेचून आणल्याचे बॅनर्स लावण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्षात हा निधी ३१ मार्च २०१७ पर्यंत पाणीपट्टी करांच्या वसुलीमधून विदर्भ पाटबंधारे विभागाला परंतु करायचे आहे. वीज जोडणी प्रकल्पांची झाली असता धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले नाही. जलाशय भरत नाही तोपर्यंत वीजपुरवठा खंडित होऊ देणार नाही, याकरिता शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले. यात जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्यासह शेखर कोतपल्लीवार, होमराज राऊत, कमलाकर निखाडे, विनोद रहांगडाले, हेमराज शिंदे, भोजराज तुरकर, मनोज चौबे, अमित मेश्राम, दिलीप बिसने, कुंजीलाल पटले, राकेश शरणागते यांच्यासह २६ जणाविरूद्ध सिहोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)