आधारभूत धान खरेदी केंद्र बंद : धानाचे दर घसरवून अडते व खासगी व्यापार्यांनी शेतकर्यांना धरले वेठीस
लाखांदूर
तालुक्यात साडे पाच हजार हेक्टर क्षेत्रात यंदा उन्हाळी धानपिकाची लागवड करण्यात आली. विशेषत्वाने बासमती धानाचा पेरा मोठय़ा प्रमाणात आहे. जास्त भाव मिळणार म्हणून शेतकर्यांनी बासमती धानाची लागवड केली. आधारभूत धान खरेदी केंद्रात हमी भाव मिळणार म्हणून शेतकर्यांना आशा होती. परंतु अद्याप सुरु झाले. नसल्याने अखेर शेतकर्यांनी खासगी व्यापारी व बाजार समितीमधील अडत्यांकडे धाव घेतली. धान्य खरेदी केंद्र सुरु न झाल्याचा फायदा घेत. अडत्यांची पडक्या दराने धान्याची खरेदी सुरु केली. आधारभूत धान्य खरेदी केंद्रात प्रतीक्विंटल १३00 रुपये दर असताना खासगी व्यापार्यांनी ९00 ते १000 रुपये प्रतिक्विंटल दराने खान्य खरेदी सुरु केली.अलीकडे
पावसाळा फसलीचे कर्ज, मुलामुलींच्या लग्नाचा कर्ज त्यात उन्हाळी धानपिकासाठी लागणारा, खर्च खासगी सावकाराचे दडपण, बँकाची दमदाटी यामुळे त्रस्त शेतकर्यांनी बासमती धान्य, १५00 रुपये प्रती क्विंटल व १0१0 वानाचे धान्य ८00 रु. प्रतिक्विंटल प्रतीक्विंटल प्रमाणे विकले. सदर भाव हे शेतकर्यांना उत्पादन खर्च व उत्पन्न यात मोठी तफावत असताना केवळ कर्जाची परतफेड करण्यासाठी सहन करावा लागला.तालुक्यात
खासगी सावकारांची संया मोठय़ा प्रमाणात आहे. प्रत्येक खेडेगावात किरकोळ धान्य व्यापारी वजनमाप धरून बसले आहेत. परंतु त्या विभागाची यांचेवर देखरेख असते. तेथील कर्मचारी व अधिकारी मुग गिळून गप्प आहेत. शासकीय नियमानुसार खासगी व्यापारी असोत किंवा बाजार समित्यांमधील अडते असोत आधारभूत धान्य दरानेच खरेदी करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास कार्यवाहीस पात्र असताना बाजार समित्या डोळे मिटून शेतकर्यांवर होणारा अन्याय चालू ठेवत ठेवत आहेत. या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने तालुकास्तरावरून मुख्यमंत्री यांना तहसीलदारामार्फत आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरु करण्यासंदर्भात निवेदने दिली. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने अद्याप धान्य खरेदी केंद्र सुरु करण्यात आले नाही. यापूर्वी शासनाने शेतकर्यांचे धान्य विक्री झाल्यानंतर बोनस जाहीर करून व्यापार्यांना सुगीचे दिवस आणले होते. यावेळी सुद्धा केंद्र सुरु न केल्याने शेतकर्यांवर कर्जाचे डोंगर चढणार आहे. बाजार समित्यांनी पुढाकार घेऊन शेतकर्यांची लूट थांबवावी तसेच पडक्या दराने धान्य खरेदी करणार्यांवर फौजदारी कार्यवाही करण्याची मागणी भाजपा तालुकाध्यक्ष वामन बेदरे, माजी जि.प. अध्यक्ष, अँड.वसंता एंचिलवार, नरेश खरकाटे, गोसू कुंभरे, राजू नाकतोडे, भारत मेहेंदळे, प्रल्हाद देशमुख यांनी निवेदनाद्वारे केली आहे. (तालुका प्रतिनिधी)लाखांदूर