शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

वरठीत सुरक्षेचा भार असुरक्षित पोलिसावर

By admin | Updated: February 26, 2015 00:31 IST

मोहाडी तालुक्यात वरठी हे गाव अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जातो. वरठी येथे १९७२ ला भंडारा पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस चौकी सुरु करण्यात आली.

तथागत मेश्राम वरठी मोहाडी तालुक्यात वरठी हे गाव अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जातो. वरठी येथे १९७२ ला भंडारा पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस चौकी सुरु करण्यात आली. त्यावेळी १ पोलीस हवालदार व २ सहाय्यक हवालदाराची नियुक्ती करण्यात आली होती. ५० वर्षानंतरही कर्मचाऱ्याची संख्या तेवढीच आहे. दरम्यान या चौकी अंतर्गत येणाऱ्या गावाचे क्षेत्र व लोकसंख्येत दहापटीने वाढले. त्याबरोबर गुन्ह्यात वाढ झाली. गावात रेल्वे स्टेशन असल्यामुळे चोरी, लुटमार, गुन्हे, अवैध व्यवसाय, वाहतूक अव्यवस्था या सारख्या घटना वाढल्या. पण पोलीस चौकीत सुधारणा झाली नाही. सुरक्षेचा प्रश्न उद्वभवल्यास आजही भंडारा येथून येणाऱ्या कर्मचाऱ्याची वाट पहावी लागते. सुरक्षा कर्मचारी कमी असली तरी परिस्थिती हाताळणारी माणसे असल्यामुळे गावात अनुचीत घटना घडत नाही. पण चोरी, लुटपाट, अवैध व्यवसाय व वाहतूक यासारख्या घटना घडतातच. १२ गाव, तीन कर्मचारी : वरठी चौकी अंतर्गत १२ गावे येतात. यात भंडारा जिल्ह्यातील मोहाडी व भंडारा तालुक्यातील गावांचा समावेश असून लगतच्या नागपूर व गोंदिया जिल्ह्याच्या सिमा पर्यंतचा भाग या चौकी अंतर्गत येतात. मोहाडी तालुक्यातील वरठी सह, एकलारी, बीड, सातोना, पाहुणा, नेरी, खमारी व भंडारा तालुक्यातील सोनुली, सिरसी, जमनी - दाभा, व पाढंराबोडी या गावाचा समावेश आहे. वरठी चौकीच्या अंतर्गत येणाऱ्या दोन टोकाच्या गावातील अंतर ३४ किमी आहे.भाड्याच्या घरात : १९७२ पासून सदर पोलीस चौकी भाड्याच्या घरात आहे. बाजारातील एका इमारतीत ही चौकी आहे. तिन खोल्याच्या या घरात असुविधांचा बोलबाला असून कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी व्यवस्था नाही. सदर घर असुरक्षीत असून वेळप्रंसगी आरोपी ठेवण्यालायक जागा उपलब्ध नाही. समोरच्या खोलीत कार्यालयाची व्यवस्था आहे. दोन नंबरच्या खोलीत आराम करण्यासाठी पंलग व दस्तावेज ठेवले आहेत. तिसऱ्या खोलीत स्वंयपाकघर असून रात्रपाळीत कार्यरत कर्मचाऱ्यांना थांबण्यासाठी वापर होतो.वाहन व्यवस्था नाही : वरठी पोलीस चौकी अंतर्गत ३४ किमीचे अंतराचे कार्यक्षेत्र आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चौकीत एकही चार चाकी वाहन नाही. पोलीस स्टेशनचे फोन खणखणाताच येथे कार्यरत कर्मचारी स्वत:च्या दुचाकीने पळत सुटतात. एखादी मोठी घटना घडल्यास किंवा दंगा झाल्यास त्यावर अंकुश लावण्यासाठी किंवा घटनास्थळावर जाण्यासाठी त्यांना भंडारा येथून येणाऱ्या वाहनाची प्रतिक्षा करावी लागते.पोलिस कर्मचारी नाममात्र येथे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक यांच्यासह तीन हवालदार अस्थायी नियुक्त आहेत. यापैकी एक कर्मचारी साप्ताहिक सुटीवर असल्यास तिनच कर्मचारी राहतात. १२ गावाची सुरक्षा व त्यासाठी असलेली व्यवस्था तोकडी आहे. त्यातल्या त्यात येथील कर्मचारी भंडारा येथे ड्युटी लावण्यात येते. कोणताही गुन्हा घडला की भंडारा येथे नोंद करण्यासाठी जावे लागते, म्हणून बहुतेक वेळा चौकी कुलुपबंद राहते.गस्तीची गरजगावात रेल्वे स्टेशन व सनफ्लॅग कंपनी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दिवस - रात्र प्रवाशांची रेलचेल राहते. रेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्था नाही. सदर परिसर यांच्या हद्दीत येते. रेल्वे स्टेशन असल्यामुळे गावात चोरांना सोयीचे होते. यामुळे येथे नियमित गस्त वाढवण्याची गरज आहे. याकरिता पोलिस वाहन व अतिरिक्त कर्मचारीची आवश्यकता आहे.असुरक्षित पोलीस : सध्याच्या युगात चोर - डाकू अद्यावत शस्त्र बाळगत असताना लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस निशस्त्र फिरतात. हातात काठी घेवून शस्त्रधारी गुंडाना किंवा गर्दीला कसे पांगवायचे असा प्रश्न त्यांना पडतो. यामुळे अनेकदा त्यांना पळ काढावा लागतो. एंकदरीत वरठी येथे नियुक्त पोलीस कर्मचारी असुरक्षित आहेत.पोलीस ठाण्याचा प्रस्ताव गायबस्व. आर. आर. पाटील यांनी ५ वर्षापुर्वी वरठी येथे पोलीस ठाणे मंजुर केला होता. दरम्यान अनेकदा मागणी झाली. पण सदर प्रस्ताव व मंजुरी गायब झाल्यासारखे दिसते.लोकसहभागावर भरपोलीस कर्मचाऱ्यांची कमी असलेली संख्या व गैरसमज यातून निर्माण होणारे क्षुल्लक वाद यावर लोकसहभागातून तोडगा काढण्याचा स्तुत्य उपक्रम या चौकीत सुरु आहे. गुन्ह्याची वास्तवता शोधून त्यातील गंभीरता पाहून गुन्ह्याची नोंद होते. आपसी विवाह व गैरसमज दुर करण्याकरिता गावातील पंचाचा आधार घेतला जातो. गावातील गुन्हे गावातच सोडवण्यात यावे, म्हणून विशेष काळजी घेतली जाते. लोकसहभागातून वाद मिटवण्याचा उपक्रम प्रेरणादायी आहे.