शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

कर्कापुरात आगीचे रहस्य कायम

By admin | Updated: April 15, 2017 00:29 IST

तालुक्यातील कर्कापूर गावात मागील दोन दिवसांपासून आगीच्या रहस्यमयरीत्या घटना घडत आहेत.

गावात दहशत : दोन दिवसांत सहा घरे, गोठा व तणसाच्या ढिगाला आगतुमसर : तालुक्यातील कर्कापूर गावात मागील दोन दिवसांपासून आगीच्या रहस्यमयरीत्या घटना घडत आहेत. १३ एप्रिल रोजी चार जणांचे घर, गोठा तणसाचे ढीग जळाले. १४ एप्रिलला दोघांचे घर व गोठा जळाला. आगीचे कारण कळू शकलेले नाही. १० वर्षापूर्वी आगीच्या अशा घटना घडल्या होत्या. त्यामुळे ग्रामस्थांत दहशत पसरली असून प्रशासन अजूनपर्यंत पोहचले नाही.तुमसरपासून दहा किमी अंतरावर पूर्वेला कर्कापूर हे अडीच हजार लोकवस्तीचे गाव आहे. येथे शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. मागील दोन दिवसापासून गावात आगीच्या घटना घडत आहेत. १३ एप्रिल रोजी येथील महादेव कमा पडोळे यांचे घर जळाले. प्रदीप पांडूरंग आगाशे यांच्या घराला आग लागली. महेश आनंदराव बुध्दे यांचा गुराचा गोठा जळाला. मुकूंद रतिराम आगाशे यांच्या तणशीच्या ढिग जळून खाक झाले.१४ एप्रिलला पुन्हा महादेव कमा पडोळे यांच्या घराला आग लागली तर माधोराव आगाशे यांच्या गुरांच्या गोठ्याला आग लागली. आगीचे कारण कळू शकले नाही. गाव दहशतीत आहे. दहा वर्षापुर्वी अशाच आगीच्या घटनेमुळे कर्कापूर गाव चर्चेत आले होते. आगीचे रहस्य अद्याप कायम आहे. सध्या येथील ग्रामस्थ रात्र जागून काढत आहेत. प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही. ग्रामस्थांनी आग विझविली. आगीच्या घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडत आहेत. एका घराला अथवा तणसीच्या ठिगाला आग लागली तर लगेच दुसऱ्या घराला नेमकी त्याच वेळेला आग लागते. प्रशासनाने येथे दखल घेण्याची गरज आहे. येथील ग्रामस्थ अभय मिश्रा तथा गणेश सिंदपूरे यांनी आगीचे रहस्य उलगडून ग्रामस्थांची भीती दूर करण्याची मागणी केली आहे. गावात आगीवर नियंत्रण प्रस्थापित करणारी यंत्रणेची व्यवस्था करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)