शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलमुक्तीच्या नावाखाली विकासाला कात्री

By admin | Updated: January 28, 2015 23:10 IST

पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचे प्रभावक्षेत्र आहे. हे प्रभाव क्षेत्र भंडारा जिल्ह्याला लागून आहे. त्यामुळे आघाडी शासनाने या जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश नक्षलग्रस्त तालुक्यात

भंडारा : पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचे प्रभावक्षेत्र आहे. हे प्रभाव क्षेत्र भंडारा जिल्ह्याला लागून आहे. त्यामुळे आघाडी शासनाने या जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश नक्षलग्रस्त तालुक्यात केला होता. परंतु राज्यातील युती शासनाने हे तालुके नक्षलमुक्त करुन या भागात येणाऱ्या निधीवर निर्बंध घातले असल्याचा आरोप माजी आमदार सेवक वाघाये यांनी केला आहे.केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून विकासकामांना कात्री लावत आहे. त्याचा परिणाम मागास जिल्ह्याच्या विकासावर होणार आहे. तत्कालीन केंद्र शासनाने भंडारा जिल्ह्यात सुरु केलेली ‘डावी कडवी विचारसरणी’ योजना बंद केली आहे. त्यामुळे ही विकासकामे ठप्प होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने ‘अच्छे दिन’ च्या योजना सुरु ठेऊन विकासात आघाडी घेण्याची गरज आहे. राज्य सरकारने या भागात देण्यात येणारा निधी बंद केला आहे किंवा केवळ कर्मचाऱ्यांचे भत्ते बंद करण्यात आले, याबाबत सरकारने, प्रशासनाला माहिती देणे आवश्यक आहे. नक्षलग्रस्त भागात साकोली विधानसभा क्षेत्राला सामावून घेण्यासाठी आपण आवाज उचलला होता.त्यानंतर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या क्षेत्रातील तीन तालुक्यांचा नक्षलग्रस्त भागात समावेश करण्यात आला होता. आता हे तालुके वगळण्यात आल्यामुळे हा निधी बंद होणार आहे. परिणामी विकासावर त्याचा परिणाम होणार असल्याचेही वाघाये यांनी सांगितले. (नगर प्रतिनिधी)