शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

देवळातील घंटीपेक्षा शाळेची घंटी महत्त्वाची

By admin | Updated: September 28, 2016 00:40 IST

विद्यार्थ्यांनी शिक्षणालाच जास्त महत्त्व द्यावे. विद्यार्थ्यांनी सातत्याने का? व्हाय?

प्रदीप ढोबळे यांचे प्रतिपादन : जिल्हास्तरीय ओबीसी मेळावाभंडारा : विद्यार्थ्यांनी शिक्षणालाच जास्त महत्त्व द्यावे. विद्यार्थ्यांनी सातत्याने का? व्हाय? अशा प्रश्नाद्वारे स्वत:ची जिज्ञासा वाढवावी याशिवाय शिक्षकांकडून का? व्हाय? ही उत्तरे मिळवून घ्यावी, यातूनच समाज व पर्यायाने राष्ट्र प्रगत व सर्जनशील होईल. त्यामुळे देवळातील घंटीपेक्षा शाळेची घंटी महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन ओबीसी सेवा संघाचे प्रदीप ढोबळे यांनी केले.भंडारा येथे सोमवारला आयोजित जिल्हास्तरीय ओबीसी मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन डॉ. संजय वाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर डॉ.महेंद्र धावडे, डॉ. जयश्री सातोकर, प्रा. जयंत झोडे, सदानंद इलमे, मंजुषा बुरडे, डॉ. अमित गायधनी उपस्थित होते. यावेळी ढोबळे म्हणाले, गाडगेबाबा विज्ञानवादी होते याचा उदाहरण देत त्यांनी कुप्रथा कशा मोडीत काढल्या हे सांगत ते कसे आपले प्ररेणास्थान आहेत हे पटवून दिले. ओबीसींनी जातीय मानसिकता सोडून एक वर्ग बनावे व संवैधानिक अधिकार प्राप्त करावे. यावेळी डॉ.संजय वाणे म्हणाले, ज्या-ज्या समाजाचा शैक्षणिक व सामाजिक विकास झाला नाही त्यांनी आंदोलन करावे. यासाठी महापुरुषांनी संघर्ष केला. त्यांचेकडून प्रेरणा घ्यावी. आपले अधिकार मिळवून घेण्यासाठी आपण कटिबध्द असलो पाहिजे ही शिक्षित लोकांची प्रमुख जबाबदारी आहे. डॉ. गुरुदास येडेवार म्हणाले, ओबीसी समाजातील जातीचा अभिमान दूर झाल्याशिवाय प्रगती शक्य नसल्याचे सांगत ‘ये जाती, तू क्यों नही जाती’ यावर काव्य सादर केले. प्रास्ताविक गोपाल सेलोकर यांनी केले. यावेळी डॉ. महेंद्र धावडे, डॉ. जयश्री सातोकर, प्रा. जयंत झोडे, सदानंद इलमे, मंजुषा बुरडे, डॉ. अमित गायधनी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भैय्याजी लांबट यांचा सेवानिवृत्ती, विकास लेंडे हे सी.ए. झाल्यानिमित्त तर गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. संचालन राकेश झोडे यांनी तर आभारप्रदर्शन गोपाल देशमुख यांनी केले. कार्यक्रमासाठी गोपाल सेलोकर, रमेश शहारे, ईश्वर निकुळे, डॉ. शैलेश कुकडे, वहीद शेख, रोशन उरकुडे, प्रा.दयाराम आकरे, बाळा गभणे, निश्चय दोनाडकर, सुधाकर मोथलकर, यशवंत फुंडे, अयज हजारे, विकास गायधने, भैय्यालाल देशमुख, डॉ. कुथे, डॉ. मेघरे, डॉ. राखडे, डॉ.बांडेबुचे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)