शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या मृत्यूला शाळा व्यवस्थापन जबाबदार

By admin | Updated: August 3, 2015 00:29 IST

तालुक्यातील पवनारखारी येथील इंदिराबाई मरसकोल्हे अनुदानित आश्रमशाळेत इयत्ता सातवीत शिकणारा...

वडिलांचा आरोप : न्याय देण्याची मागणीतुमसर : तालुक्यातील पवनारखारी येथील इंदिराबाई मरसकोल्हे अनुदानित आश्रमशाळेत इयत्ता सातवीत शिकणारा प्रफुल गळीराम वरकडे याच्या मृत्यूस शाळा व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप मृतकाचे वडील गळीराम वरकडे यांनी केला आहे.गोबरवाही जवळील पवनारखारी येथे खासगी अनुदानित इंदिराबाई मरसकोल्हे आदिवासी आश्रमशाळा असून या शाळेत संचालकाचा वाद फोफावला असल्यानेच तेथील कर्मचाऱ्यात शीतयुद्ध सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष पुरविले जात नाही. १५ दिवसापूर्वी गळीराम वरकडे रा.राजापूर यांचा मुलगा प्रफुल वरकडे (१२) हा आश्रमशाळेत गेला. त्यावेळी तो सुदृढ होता. त्याला कसलीही जखम किंवा आजार नसतानाही त्याची प्रकृती अचानक बिघडली असल्याचे सांगल्या जात असून त्याच्या मानेवर सूज आल्याचे सांगण्यात येत आहे. ती सूज कशी आली? त्याला कोणी मारले असावे? की तो खाली पडून त्याला जखम झाली हे सर्व प्रश्न अनुत्तरीत असून जर त्याच्या मानेवर सूज दिसत होती तर शाळा व्यवस्थापनाने याची माहिती पालकांना देणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. इतकेच काय तर जेव्हा प्रफुल्लला दि. २९ जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र गोबरवाही येथे दाखल केल्यानंतर देखील त्याच दिवशी पालकांना महिती न देता दुसऱ्या दिवशी दि. ३० जुलैला सांगण्यात आले. त्यावेळी प्रथम तुमसर व नंतर भंडारा येथे रेफर केल्या गेले व नंतर नागपूर येथे रेफर करीत असतानाच वाटेतच त्याचे निधन झाले असून शाळा प्रशासन डोळ्यात सूज आल्याचे सांगते तर ती सूज आली कशी हे अजूनपर्यंत अनुत्तरीय असून माझ्या मुलावर जर वेळीच उपचार केला गेला असता तर त्याचा जीव वाचला असता. मात्र असे काहीच करण्यात न आल्यामुळेच माझ्या मुलाचा मृत्यू झाल्याचे गळीराम वरकडे यांचे म्हणणे आहे. (शहर प्रतिनिधी)