शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सौंदडवासीयांनी काढला पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 23:13 IST

सौंदड पुनर्वसन सतरा दिवसांपूर्वी घडलेल्या मारहाणीचा प्रकार माणुसकीला कलंक लावणारा आहे. असा प्रकार यापूर्वीही अड्याळ पोलीस ठाणे हद्दीत घडला होता. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी या आधीही मोर्चा काढला होता. पोलीस प्रशासनाने ग्रामस्थांना आश्वासन दिले होते परंतु त्यातही ते ‘सपशेल फेल’ ठरले. कारवाई आरोपींवर करण्यापेक्षा निर्दोषांवर करण्यात आल्याने सौंदडवासियांनी अड्याळ पोलिसा ठाण्यावर शांततेत मोर्चा काढला.

ठळक मुद्देआक्रोश कायम : प्रकरण सौंदड येथील गौ-तस्करांकरवी मारहाणीचे

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : सौंदड पुनर्वसन सतरा दिवसांपूर्वी घडलेल्या मारहाणीचा प्रकार माणुसकीला कलंक लावणारा आहे. असा प्रकार यापूर्वीही अड्याळ पोलीस ठाणे हद्दीत घडला होता. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी या आधीही मोर्चा काढला होता. पोलीस प्रशासनाने ग्रामस्थांना आश्वासन दिले होते परंतु त्यातही ते ‘सपशेल फेल’ ठरले. कारवाई आरोपींवर करण्यापेक्षा निर्दोषांवर करण्यात आल्याने सौंदडवासियांनी अड्याळ पोलिसा ठाण्यावर शांततेत मोर्चा काढला.अड्याळ पोलीस ठाण्यामध्ये ग्रामस्थांनी तहसिलदार गजानन कोकुर्डे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिक्क्स, पोलिस निरिक्षक सुरेश ढोबळे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.निवेदनात एकूण १० प्रमुख मागण्यांचा उल्लेख करण्यात आला. त्यात हल्ल्याचा खटला जलदगतीे न्यायालयाद्वारे चालविण्यात यावा, हल्लेखोरांवर ३०७ कलम लावावी, गावात सशस्त्र पोलीस चौकी द्यावी, हल्ल्यातील जखमींना आर्थिक मदत मिळावी, छेडखानी करण्यात आलेल्या महिलांना एस.सी., एस.टी. कायद्याप्रमाणे मदत करावी, ग्रामस्थांवरील लावलेले गुन्हे मागे घेणे, गोतस्करीत वापरलेले ट्रक तात्काळ जप्ती करणे, फरार आरोपींना अटक झालेल्या लाठीहल्ल्याची चौकशी करावी अशी मागणी आहे. तसेच सर्वात शेवटी आणि महत्वाचे म्हणजे भंडारा जिल्ह्यातील गुरांच्या बाजारातून होणाऱ्या गोस्तकरी अड्यांवर कारवाई करून वापरण्यात येणाºया वाहनाचे परवाने रद्द करण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे.सौंदड पुनर्वसन वासीयांनी पोलिसांना तात्काळ मदत मागितली होती. त्यावेळी पोलिसांनी तात्काळ मदतीचा हातही दिला नाही.फरार आरोपींना अटक झाली असती तर मोर्चा निघाला असता काय, असाही सवाल यावेळी उपस्थितांनी केला. अशा प्रकारच्या घटनेचा निषेध करून पायबंध घालण्यासाठी तसेच शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मोर्चा काढला असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.