शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मंत्रालयाच्या सदस्यांपेक्षा सरपंच ‘लय भारी’!

By admin | Updated: November 3, 2016 00:43 IST

ग्रामपंचायतींना अधिकार दिले जात नसल्याची ओरड आता संपणार आहे. चौदाव्या वित्त आयोगाचे अनुदान थेट ...

अधिकार वाढले : ग्रामपंचायती होणार श्रीमंत, १४ व्या वित्त आयोगाचे अनुदान थेट ग्रामपंचायतलाभंडारा : ग्रामपंचायतींना अधिकार दिले जात नसल्याची ओरड आता संपणार आहे. चौदाव्या वित्त आयोगाचे अनुदान थेट ग्रामपंचायतींलाच मिळणार असून जिल्हा परिषद सदस्यांपेक्षा सरपंच वरचढ ठरणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील ५४३ ग्रामपंचायतींना होणार आहे.पूर्वी जिल्हा परिषद सदस्यांना विकास निधीतून कामे करता येत होती. त्या निधीवर त्यांचा अधिकार राहत होता. मात्र, कालांतराने शासनाने जिल्हा परिषद सदस्यांचे अधिकार कमी केले आहेत. त्यांच्या तुलनेत विकास कामांचे अधिकार व निधीचा वापर ग्रामपंचायत सरपंच यांना करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहे. यावर्षीपासून राज्यातील २९ हजार ग्रामपंचायतींना आगामी पाच वर्षांत सुमारे १५ हजार कोटींचा निधी मिळणार आहे. निधीमधून कुठली कामे करायची किंवा नाही याचे सर्व अधिकार ग्रामपंचायतींना असतील. ग्रामपंचायत बळकटीकरणासाठी निर्णय घेतला असला तरी जि.प. व पं.स. मधील सदस्यांना फटका बसेल. केंद्र शासनाने ग्रामपंचायतींना जास्तीचे आर्थिक अधिकार देण्यासाठी २०१३ मध्ये डी. वा. व्ही. रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली चौदाव्या वित्त आयोगाची स्थापना केली. आयोगाने केलेल्या शिफारसी शासनाने आता स्वीकारल्या आहेत. आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना २०१५ ते २०२० पर्यंत १५ हजार ३५ कोटींचे अनुदान केंद्र शासन देणार आहे. राज्यातील जवळपास २९ हजार ग्रामपंचायतींना पंचावार्षिक योजनेतून ५२ लाखांचे भरीव अनुदान थेट मिळेल. अकराव्या वित्त आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेल्या १०० टक्के निधी जिल्हा परिषदेमार्फत खर्च करण्यात आला. त्यानंतर बाराव्या वित्त आयोगाकडून उपलब्ध झालेला निधी जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रत्येकी २५ टक्के व ग्रामपंचायतींना ५० टक्के वर्ग करण्यात आला. तेराव्या वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषद १०, पंचायत समिती २० आणि ग्रामपंचायती ७० टक्के खर्च करण्यात आला. आता चौदाव्या वित्त आयोगाने हा निधी १०० टक्के ग्रामपंचायतींना मिळणार आहे. मागील तीन वर्षांपासून रखडलेली मागणी यंदा सरकारने मान्य केली आहे. (शहर प्रतिनिधी) पंचायत समिती कोलमडणार !ग्रामपंचायतींना अधिकार दिले तर मध्यस्थी स्थानिक स्वराज्य संस्थांचे काय होणार ? त्या कोलमडून तर जाणार नाहीत नाही, असाही प्रश्न आहे. गावामध्ये सरपंच ग्रामसेवक निर्णय घेत असतात. ग्रामपंचायतींना अधिकार दिले ही बाब चांगली आहे, मात्र जिल्हा परिषद, पंचायत समितीचीही भूमिका महत्त्वाची आहे. चौदाव्या वित्त आयोगामुळे पंचायत समिती कोलमडणार का, अशी भिती निर्माण होत आहे.