शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पुतळ्यांच्या सुरक्षेवरुन सरपंच एकवटले

By admin | Updated: April 18, 2015 00:22 IST

सिहोरा परिसरातील गावात महापुरुषाचे, देवी देवतांचे पुतळे उभारण्यात आली आहेत.

समित्यांची नोंदच नाही  अनेक मंडळ बरखास्त  पुतळ्याचे सौंदर्य हरपले  सिहोरा परिसरात ५४ पुतळे चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरातील गावात महापुरुषाचे, देवी देवतांचे पुतळे उभारण्यात आली आहेत. परंतु या पुतळ््यांचे सौंदर्य हरपले आहेत. निधी आणि दुर्लक्षीतपणामुळे पुतळ््यांचा परिसर विकसित झालेला नाही. याकरिता महिला सरपंच एकवटली आहेत. पुतळ््याची सुरक्षा करणाऱ्या यत्रंणेची नोंद केली जाणार असल्याची माहिती या सरपंचांनी दिली आहे.गावात विविध जाती, धर्मांचे नागरिक वास्तव्य करित आहेत. सर्वधर्मसमभावाची जोपासना गावकरी करीत आहेत. गावात याच धार्मिक भावनेतून महापुरुषांच्या पुतळ््याची उभारणी करण्यात आली आहेत. आराध्य दैवतांचे मंदिर आणि देवस्थान गावात आहेत. या महापुरुषांच्या पुतळ््याचे सौंदर्य करण्याची जबाबदारी स्थापन करण्यात आलेल्या पुतळा सुरक्षा समिती तथा युवा मंडळाची आहे. परंतु रोजगारांच्या शोधात अनेक गावातील वस्त्या रिकाम्या झालेल्या आहेत. गावात तरुण पिढी दिशेनासी झाल्याने पुतळ््यांचे सौंदर्यकरण अडचणीत आले आहे. शासन स्तरावर ग्रामपंचायतींना अनुदान देण्यात येत नाही. निधी उपलब्ध करण्याची तरतुद नसल्याने पुतळा परिसराचे सौंदर्य अडचणीत आले आहे.याच पुतळा परिसरात बाग बगीचा तयार केला जावू शकतो. परंतु निधीची चणचण विकासाला आडकाठी ठरत आहे. या पुतळ््याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मंडळांची नोंद यंत्रणेच्या दस्तऐवजात नाही. यामुळे मंडळांचे नेतृत्व चिरकाल टिकणारे नाही. सिहोरा परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे २१ पुतळे आहेत. तथागत महात्मा गौतम बुध्द २३, राष्ट्रपिता महात्मा गांधी २, अन्य महापुरुष ८, असे एकूण ५४ पुतळे आहेत. या शिवाय मंदिराची संख्या ६५ आहे. बौध्द बांधवाचे ६ विहार आहेत. तर मस्जिद १ आहे.स्मशानभूमीत भगवान भोलेनाथचे पुतळे उभारली जात आहेत. सार्वजनिक जागेत असणाऱ्या पुतळ््याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. या पुतळ््याचे सौंदर्यकरणाला आधार तथा निधी देतांना सामान्य फंडाची आठवण केली जात आहे. धार्मिकरित्या लोकवर्गणीतून देवस्थानाची जोपासना केली जाते. परंतु अल्प लोकवर्गनी असल्याने ग्रामीण भागात मंदिर आणि पुतळ््याचे कायापालट होत नाही. पार्क निर्मितीचा संकल्प गावात असतांना निधी प्राप्त होत नसल्याने गावाचे चित्र भकास झाले आहे. गावात जागा आहे. परंतु मॉडेल तयार करणारे चित्र निर्माण होत नाही. गाव घडविण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रतिसाद देत नाही. सौदर्यकरणात भर घालणारे मॉडेल तयार करण्याची गरज आहे.(वार्ताहर)गावात पुतळे आणि मंदिर आहेत. पुरातन ठेवा जपुन ठेवण्यासाठी धडपड होत आहे. अनेक मंदिराचे जीर्णोद्वार निधीअभावी अडले आहे. दोन नद्यांचा संगम गावात असतानाही परिसराचा विकास झाला नाही.- साधना वाल्दे, सरपंच बपेरागावात असणारे पुतळे आणि मंदिरांची देखरेख स्थापन करणारे मंडळे करित असून, या मंडळांची तथा कार्यकारी पदाधिकाऱ्यांची नोंद निश्चितच ग्राम पंचायतमध्ये असली पाहिजे. वार्षिक पुतळे आणि मंदिरांची रंगरंगोटी करणार आहे.- विमल कानतोडे , सरपंच मोहाडी (खापा)परिसरात नद्यांचे सौंदर्य आहे. हिरवळ विस्तारलेली आहे. परंतु पर्यटक आणि भाविकांना आकर्षित करणारा मॉडेल नाही. तिर्थस्थळाचा पर्यटन निधीमधून मॉडेल तयार करण्याची गरज आहे. नद्यांचे सौंदर्यकरण केल्यास पर्यटकांना भुरळ घालणार आहे.- अजंली पारधी, गृहीणी वारपिंडकेपारदेवरी (देव) गावात मुस्लिम बांधवाचे श्रध्दास्थान असणारी दरगाह आहे. परंतु गावात मुस्लिम बांधवाचे वास्तव्य नाही. या दरगाहाची जोपासना हिंदु आणि बौध्द बांधव करित आहेत. या स्थळाचा विकास झालेला नाही. लोकप्रतिनिधींनी अनुदान देण्याची गरज आहे.- प्रेरणा तुरकर, सरपंच देवरी(देव)चुल्हाडच्या स्मशानभूमीत भगवान भोलेनाथाची मुर्ती स्थापन करण्यात येत आहे. या स्मशानभूमीचा प्रथमत:च सौदर्यकरण होणार आहे. अन्य पुतळ््याची जोपासना करण्यासाठी विशेष निधीची गरज आहे.- रेखा सोनेवाने , सरपंच चुल्हाड