शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

रेतीचोरीला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2016 00:48 IST

तालुक्यातील एकाही रेतीघाटाचे लिलाव झालेले नसतानाही मोहाडी तालुक्यातील रेतीघाटातून सर्रासपणे रेती काढून ...

सिराज शेख मोहाडीतालुक्यातील एकाही रेतीघाटाचे लिलाव झालेले नसतानाही मोहाडी तालुक्यातील रेतीघाटातून सर्रासपणे रेती काढून चढ्या भावाने रेती विक्री जोमात सुरू आहे. या प्रकाराला महसूल विभागातील मंडळ अधिकारी व तलाठी यांचा आशिर्वाद प्राप्त असल्यानेच रेती तस्करांचे फोफावत असल्याचे बोलले जाते.मोहाडी तालुक्यातील वैनगंगा नदीपात्रतील बेटाळा, मोहगाव, मुंढरी, रोहा, पांजरा तसेच सुरनदी पात्रातील रेती दिवसा ढवळ्या चोरी केल्या जात आहे. मोहाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात घर बांधकामाचे कामे सुरू असून त्याठिकाणी बिनादिक्कत रेती आणली जात आहे. मात्र रेतीघाटाचे लिलाव न झाल्याने रेतीचे भाव आकाशाला भिडलेले आहेत. नागरिक आपल्या घराचे बांधकाम थांबवून ठेवण्याऐवजी हजार दोन हजार जास्त गेले तरी चालेल म्हणून रेती तस्कराकडून अधिक भावाने रेती घेत आहेत. आम्हाला अधिकाऱ्यांचे हात ओले करावे लागतात. त्यामुळे रेतीचे भाव थोडे जास्तच ठेवावे लागतात असे रेती आणून देणाऱ्यांचे म्हणणे असते.मोहगाव, पांजरा, बेटाळा, सातोना तसेच सुरनदीवरील इतर रेतीघाटावरून दररोज हजारो ब्रास रेतीची चोरी होत असल्याने शासनाच्या लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. मात्र या रेतीव्यवसायातून जरी शासनाचा नुकसान होत असेल पण रेती तस्कर व काही महसूल अधिकारी मालामाल होत आहेत. बांधकामावर सर्रास रेती पोहचत आहे हे उच्च अधिकाऱ्यांना सुद्धा दिसते. मात्र काही तांत्रिक कारणे समोर करून तेरी भी चुप मेरी भी चुप असा कारभार बिबोभाटपणे सुरू असल्याने रेती चोरीवर आळा घालणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. रेतीच्या ट्रॅक्टरमुळे व ट्रकमुळे घाटाजवळील गावातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. आणि या जिवघेण्या रस्त्याचा सर्वात जास्त त्रास ग्रामीण जनतेला सहन करावा लागत आहे. महिन्यातून दोन चार ट्रक किंवा ट्रॅक्टरवर कारवाई करून आम्ही किती दक्ष आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न महसूल विभाग अवश्य करीत असतो.रेतीघाटांचे लिलाव नेहमीच उशीरा करण्यात येतात आणि बांधकामाला रेतीची आवश्यकता असल्याने काहीही करा रेतीचोरी करावीच लागते, असा प्रकार सुरूच असतो. प्रशासन पहिल्या लिलावाची मुदत संपण्यापूर्वीच दुसरा लिलाव कां करीत नाही, असा प्रश्न साहजिकच जनता विचारत आहे. यावरून मधातला तिनचार महिन्याचा काळात रेतीचोरी होणारच हे प्रशासनाला माहित नसते का, तसेच रेती चोरी व्हावी हा प्रशासनाचा उद्देश तर नाही ना असाही प्रश्न जनता करीत आहे. मात्र महसूल विभागातर्फे अपुरा कर्मचारीवर्ग, पोलीस व महसूल विभागाचा समन्वय तसेच रात्रीच्या वेळी कर्मचाऱ्यांच्या जिवाची सुरक्षा असे कारणे दिली जातात. बहुतांशवेळी ही कारणेही योग्यच मानावी लागतात. वेळेवर रेतीघाट लिलाव होणे हेच एक उपाय आहे.