वन अभ्यासकांची माहिती : नवीन नागझिरा एक उच्च प्रतीचे जंगलसंजय साठवणे साकोलीनवीन नागझिरा अभयारण्यात वनाची घनात जास्त असून अगदी काही वर्षातच वन्यजीवांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. शिवाय नागझीरा, नवीन नागझीरा, नवेगाव, उमरेड, कऱ्हांडला, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, कोका ही अभयारण्य वन्यजीव वाढीस पोषक असून पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने मोलाचे ठरणार आहे.सन २०१२ मध्ये घोषित झालेले नवीन नागझिरा अभयारण्य एक उच्च प्रतिचे जंगल आहे असे अरण्ययात्रा या पुस्तकाचे लेखक विनोद भोवते म्हणाले. सन १९५७, १९५९, १९६६, १९६९ या वर्षात वनविभागाने लावलेले साग प्लेंटेशन वाखाण्याजोगे होते. १९७४ पासून हे जंगल वनविकास महामंडळाच्या अखत्यारित आले. सन २०१२ मध्ये याच भागात वन्यजीवांचे रक्षण, संरक्षण करण्यासाठी नवीन नागझिरा अभयारण्याची स्थापना करण्यात आली. त्यामुळे अनेक प्राणी, पक्षी, किटक, वनस्पती यांना कायमचे संरक्षण मिळाले आणि यातूनच जंगलाचे संवर्धनही झाले. साग, बिजा, येन बघेडा, हिरडा, आवळा, मोह, चार सूर्या, कोजब, वड, पिंपळ, हिवर लेंडी, धावडा, बांबू इत्यादी घनदाट झाडांमध्ये अनेक प्रकारच्या वेली त्याचप्रमाणे वाघ, बिबट, अस्वल, चांदी अस्वल, राजकुत्रा, रानमांजर, लांडगा, कोल्हा, नील, सांबर, चितळ, भेडकी, चौशिंगा, रानगवे, खवल्यामांजर, मसव्याउद, पानर इत्यादी प्राणी तसेच घार, गरुड, बाज, टाकचोर, पोपट, मोर इत्यादी अनेक प्रकारचे पक्षी या भागात आढळतात. या अभयारण्यात हल्पाडोह, गायखुरी झरा, लांबणीची पहाडी, ब्रिटीशकालीन खराडी विहिर, नारळखाईनाला, रिसाळा तलाव, चांदीडिब्बा, व्ही. आय.पी. रोड, १३९ ची टेकडी खसाऱ्या डोंगर, पाटदेव तलाव, कोवाराणी पहाडी, जमनखाई, वाटेकसा, उंधरझरा इत्यादी भाग म्हणजे वन्यजीवांचे माहेर, नवेगाव-नागझीरा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उ.श. सावंत यांचे अभयारण्याच्या विकासाकडे विशेष लक्ष असून पर्यटकांना खुणावणारे ठरत आहे. हे त्यांच्या गर्दीवरुन दिसून येते.
पर्यावरण संतुलनासाठी अभयारण्य मोलाचे
By admin | Updated: June 14, 2016 00:20 IST