शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

समीर व वंशच्या भेटीला येतात पक्षी

By admin | Updated: May 15, 2016 00:19 IST

धावपळीच्या युगात आज माणूस माणसापासून दुरावला आहे.

झाडावर पक्ष्यांसाठी पाणपोई भंडारा : धावपळीच्या युगात आज माणूस माणसापासून दुरावला आहे. त्यात प्राणी पक्ष्यांचे तर दूरच. परंतु, खात रोडवरील खोकरला ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सुर्यकेतू नगर येथील पक्षीमित्र भावंडांना पशुपक्ष्यांशी लळा लागला. उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता त्यांनी घराच्या अंगणातील सदाफुलीच्या झाडावर पक्षांसाठी खाणावळ आणि पाणपोईची व्यवस्था केली. त्यामुळे दैनंदिनी त्यांच्या भेटीला अनेक पक्षी येऊ लागले आहे. त्यांच्या प्रतीक्षेत दोघेही भावंड असतात. दोघांनीही उपक्रमातून पक्षी वाचवा हा संदेश दिला आहे. समीर आणि वंश राजू आगलावे अशी पक्षीमित्र भावंडाची नावे आहे. समीर नववीचा तर वंश पाचवीचा विद्यार्थी आहे. दोघांनाही पशुपक्ष्यांशी लळा आहे. शिक्षक व आईवडीलांच्या मार्गदर्शनात उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता त्यांनी पक्ष्यांकरिता पाणी पिण्यासाठी पाणपोई व खाण्यासाठी खाणावळ म्हणून घराच्या अंगणात असणाऱ्या सदाफुलीच्या झाडाला पक्षीपात्र व इतर मातीचे भांडे बांधून पक्ष्यांसाठी सोय केली. दोघेही भावंड हे शिजलेले अन्न, पाणी त्या भांड्यामध्ये ठेवत असतात. पक्ष्यांनाही आता भावंडांच्या घराची सवय लागली आहे. दैनंदिनी दोघेही भावंड पक्ष्यांची वाट बघत असतात. अनेक पक्षी त्यांचेकडे येवून खाद्य व पाणी पिवून तृप्त होतात. त्यांंच्या या उपक्रमाचे सर्वच कौतुक करीत आहेत. पशुपक्षी निसर्गाचे महत्वाचे घटक आहे ते वाचले तरच पर्यावरण संतुलित राहील. पक्ष्यांना वाचविण्यासाठी आम्ही अशा प्रकारे पाणपोई आणि खाणावळ सुरू केली. या माध्यमातून पक्ष्यांना वाचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येकाने पक्ष्याबद्दल कळवळा दाखविला तर पक्ष्यांचे जीव आणि पर्यावरणही वाचेल असा विचार हे दोन्ही पक्षीमित्र भावंड करतात. या उपक्रमासाठी आईवडिल व शिक्षकांकडून प्रेरणा मिळाल्याचे ते सांगतात. (शहर प्रतिनिधी)