साकोली : साकोली पंचायत समिती इमारत ही जीर्ण अवस्थेत असल्याने पंचायत समिती नव्याने बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला. साकोली पंचायत समितीची जूनी इमारत खाली करून ती प्रगती कॉलनीस्थित भाड्याच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आली. पंचायत समिती ही सेंदुरवाफा इथे असल्याने साकोलीत आलेल्या नागरिकांना दोन कि़मी. अंतर पायी जावे लागते.साकोली पंचायत समिती ही तीन चार जागी विखूरली असून अनेक विभाग दूर दूर अंतरावर आहेत. सध्या तीन ते चार वर्षे लोटूनही नवीन पंचायत समिती निर्मितीला सुरुवात न झाल्याने तालुकावासीयांत नाराजीने वातावरण पसरले आहे. लोकप्रतिनिधी, पंचायत समिती पदाधिकारी, प्रशासन, शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे सदर काम रखडले आहे. साकोली पंचायत समिती इमारतीला अजून किती वेळ लागेल असा सवाल आहे. शासनाच्या वेगवेगळ्या योजना पंचायत समिती मार्फत चालविल्या जातात. ग्रामीण भाग व प्रशासन यांच्यातील पंचायत समिती त्या मार्फत चालविल्या जातात. ग्रामीण भाग व प्रशासन यांच्यातील पंचायत समिती ही दुवा म्हणून काम करीत असते. यात पशु व आरोग्य विभाग, कृषी विभाग, बालकल्याण विभाग, बांधकाम विभाग, अर्थ विभाग, शिक्षण विभाग, रोजगारहमी विभाग, कार्यरत असते. पं.स. पदाधिकारी, शासन, प्रशासन, नागरिक यांच्यातील पंचायत समिती विकासाच्या योजना राबविणारा केंद्रबिंदू असते. बांधकाम रखडल्याने लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मूत्रिघर, शौचालय व पिण्याच्या पाण्याची समस्या नागरिकांकरिता डोकेदुखी ठरत आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या पं.स. तीत विविध विभाग चार जागी विखुरले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. (तालुका प्रतिनिधी)
साकोली पं.स. इमारतीचे बांधकाम केव्हा होणार?
By admin | Updated: July 12, 2014 00:55 IST