शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

साकोलीवासीयांनी पाळला कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2016 00:26 IST

येथील प्रगती कॉलनी साकोली येथे रामनवमीच्या दिवशी लावण्यात आलेल्या बॅनरची जाळपोळ करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली नाही.

प्रकरण बॅनर जाळल्याचे : आरोपींना शोधण्यात पोलिसांना अपयश, दिवसभर शहरात शांततासाकोली : येथील प्रगती कॉलनी साकोली येथे रामनवमीच्या दिवशी लावण्यात आलेल्या बॅनरची जाळपोळ करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली नाही. या कारणावरुन बजरंग दलातर्फे आज साकोली बंदचे आयोजन करण्यात आले होते. या घटनेचा निषेध म्हणून आज साकोली कडकडीत बंद होती.प्रगती कॉलनी साकोली येथे १४ ला प्रभु श्री रामनवमीनिमित्त प्रभु श्रीरामाचे चित्र असलेला बॅनर लावण्यात आला होता. मात्र काही समाज कंटकांनी हिन्दु धर्मीयांच्या भावना दुखावून धार्मिक तेठ निर्माण करण्याचा प्रयत्नातून प्रभु श्रीरामाचे बॅनर जाळले. या प्रकरणाची तक्रार बजरंग दलातर्फे १९ ला पोलीस स्टेशन येथे देण्यात आली व सोबतच सिसीटीव्हीची फुटेजही देण्यात आली. तक्रार देऊन तब्बल सात दिवसाचा कालावधी लोटला. मात्र पोलिसांनी अजुनपर्यंत आरोपीला अटक केली नाही. या घटनेचा निषेध म्हणूनबजरंग दलातर्फे आज साकोली बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आज शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालय व औषधी दुकाने वगळता सर्व दुकाने कडकडीत बंद होती.या दरम्यान बजरंग दलातर्फे साकोलीत रॅली काढून पोलीस प्रशासन व बॅनर फाडणाऱ्या आरोपीविरुध्द निदर्शने देण्यात आली. यानंरत तहसिलदार यांच्यासोबत चर्चा करुन आरोपींना सात दिवसात अटक करण्याची मागणी करण्यात आली व प्रशासनातर्फे आरोपीला अटक करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.यावेळी तालुका संयोजक पुष्कर करंजेकर, छावा संग्राम परिषदेचे अध्यक्ष झनकलान लांजेवार दिपक लिवरे, अमित चन्ने, प्रणीत पालीवाल, ऋषभ पांडे, याज्ञीक उके, अनिकेत चिरवतकर, निलेश सिंग, रोशनसिंग, सोनु भुरे, करन कुरंजेकर, सौरभ कापगते, तिलक वैद्य, हर्षल जावरकर, मयुर रेवतकर, मनिष आचार्य, सुमेध खनघन, बंटी आंबेकर, लोकेश गभणे, विकास गायधने, यशवंत इखार, निशांत पडोळे, ईद्रायणी कापगत,े सिनरन कापगते, दिक्षा भुरे, पुनम चांदेवार, शितल लाडे, मनिष कापगते, किशोर बावने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)