शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

साकोली ग्रामपंचायतचे लवकरच रूपांतर नगरपंचायतीत होणार

By admin | Updated: January 29, 2015 23:01 IST

मागील बऱ्याच वर्षापासून साकोलीवासीयासाठी दिवास्वप्न ठरलेली नगरपंचायतीची कधीही घोषणा होऊ शकते. या नगरपंचायतीची शासनस्तरावरून प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून

साकोली : मागील बऱ्याच वर्षापासून साकोलीवासीयासाठी दिवास्वप्न ठरलेली नगरपंचायतीची कधीही घोषणा होऊ शकते. या नगरपंचायतीची शासनस्तरावरून प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून पंचायत समिती सदस्यांना त्यांचे क्षेत्र नगरपंचायतीत समाविष्ट होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.मागील वर्षी शासनाने महाराष्ट्रातील १३८ तालुकास्तरीय ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याची घोषणा केली होती. यामध्ये जिल्ह्यातील साकोली, लाखनी व मोहाडी या तीन ग्रामपंचायतीचा समावेश होता. तेव्हापासून या नगरपंचायतीच्या प्रक्रियेला शासनस्तरावरून सुरवात झाली आहे. वर्षभरापासून ग्रामविकास मंत्रालय व नगरविकास मंत्रालय यासंदर्भात संबंधित पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरून माहिती मागवित आहे. त्यामुळे या नगरपंचायतीची सर्वच प्रक्रिया पुर्णत्वास गेली असून अंतीम टप्प्याची तयारी बाकी आहे.साकोली पंचायत समितीचे पंचायत समिती सदस्य मदन रामटेके यांना नुकतेच जिल्हाधिकारी यांचे पत्र प्राप्त झाले असून या पत्राच्या अनुषंगाने साकोली पंचायत समिती गणाचे सर्व क्षेत्र ८५८.५२ हेक्टर आर हे नगरपंचायतीत समाविष्ट होत आहे. त्यासाठी सदर क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारे पंचायत समिती सदस्याचे सदस्यत्व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम २५७ अन्वये रद्द करणे क्रमप्राप्त आहे. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे संबंधित सदस्याला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी सुनावणीची संधी देण्यासाठी ३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे बोलाविण्यात आले आहे. त्यामुळे साकोली नगरपंचायतीची घोषणा कधीही होऊ शकते यात मात्र आता शंका नाही.