शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियंत्रणाकरिता नियम पाळून कर्तव्य बजावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:45 IST

पालांदूर : कोरोना संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांत झपाट्याने वाढ होत असल्याची चिन्हे आहेत. प्रत्येकाने स्वतः सजग राहत इतरांनाही सजग करीत, ...

पालांदूर : कोरोना संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांत झपाट्याने वाढ होत असल्याची चिन्हे आहेत. प्रत्येकाने स्वतः सजग राहत इतरांनाही सजग करीत, कोरोना संसर्गजन्य आजार रोखण्याकरिता नियमांचे तंतोतंत पालन करा, असे आवाहन पोलीस निरीक्षक मनोज सिडाम यांनी केले. पोलीस पाटील यांच्या सभेत पालांदूर पोलीस स्टेशन येथे ते पोलीस पाटलांना मार्गदर्शन करीत होते.

ते म्हणाले, पोलीस पाटील हा समाज व पोलीस विभागातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. समाजातील शेवटच्या टोकापर्यंत सहकार्याच्या भावनेने पोहोचत कोरोना संसर्ग टाळण्याकरिता आपण यापूर्वी लाखमोलाचे कार्य केलेले आहे. आपल्या यथार्थ सेवेने कोरोनाची लाट कमी करण्याकरिता खूप मोठी मदत कामी आली. तीच दृष्टी, तीच तळमळ आजही आपण स्वीकारत कोरोनाची दुसरी लाट थांबविण्याकरिता सहकार्य करावे.

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, प्रत्येक सामाजिक व्यक्तीने सामाजिकतेचे भान ठेवून राष्ट्रीय धर्म निभवावा. विनामास्क फिरू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, शक्‍यतो अजिबात गर्दी करू नये, सॅनिटायझरचा वापर नियमित करावा.

गरज असेल तरच घराबाहेर पडावे. लग्नसमारंभात केवळ ५० व्यक्तींची हजेरी असावी. अंत्यविधीला २० लोकांपेक्षा अधिक असू नये. अशा नियमांत राहून कुटुंबाप्रति जागरूकता बाळगत राष्ट्रीय धर्म जागविण्याकरिता प्रत्येक पोलीस पाटलाने स्वतःच्या गावात कार्यतत्पर असावे. काही समस्या उद्भवल्यास थेट पोलीस स्टेशनला भ्रमणध्वनीवरून संपर्क करून, गावात शांतता सुव्यवस्था राखण्याकरिता सहकार्य करावे. सूत्रसंचालन पोलीस पाटील सुनील लुटे, आभार पोलीस शिपाई नावेद पठाण यांनी केले. प्रस्तावना पोलीस पाटील गुनीराम बोरकर यांनी केले. कार्यक्रमाकरिता पो.हवा. कचरू शेंडे, हेमराज मेश्राम, श्यामराव चाचेरे, सहायक फौजदार प्रकाश तलमले आदींनी सहकार्य केले.