शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ ‘दलाल मुक्ती’पासून दूरच!

By admin | Updated: January 24, 2015 00:18 IST

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील दलालांकडून नागरिकांची आर्थिक पिळवणूक होते. यामुळे आरटीओ कार्यालय 'दलाल मुक्त' करण्याचे आदेश आरटीओ आयुक्त महेश झगडे यांनी दिले आहे.

प्रशांत देसाई भंडाराउपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील दलालांकडून नागरिकांची आर्थिक पिळवणूक होते. यामुळे आरटीओ कार्यालय 'दलाल मुक्त' करण्याचे आदेश आरटीओ आयुक्त महेश झगडे यांनी दिले आहे. शनिवारपासून राज्यात या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी, भंडारा आरटीओ कार्यालयात दलालांचे व्यवहार राजरोसपणे सुरू असल्याचे चित्र शुक्रवारी बघायला मिळाले.उपप्रादेशिक कार्यालयाने नागरिकांसाठी कायदे बनविले आहे. त्या कायद्याच्या चाकोरीत राहूनच त्यांनी आरटीओ कार्यालयातील कामे केल्यास नियमानुसारच पैसे दिल्यास त्यांची आर्थिक पिळवणूक होणार नाही. मात्र, या कार्यालयाने काही अधिकृत दलालांची नियुक्ती केलेली आहे. अनेक युवकांची मागील अनेक वर्षांपासून नियमबाह्यरित्या आरटीओ कार्यालयात दलाली सुरू आहे. दलालांचे वास्तव्य या कार्यालय परिसरात असल्याने ते नागरिकांकडून जादा रक्कम घेऊन काम करतात. नागरिकांची होणारी लुट थांबावी, यासाठी उपप्रादेशिक परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी, राज्यातील सर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय 'दलाल मुक्त' करण्याचा विळा उचलला आहे. त्याअनुशंगाने महेश झगडे यांनी नुकतीच आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतली असून नवे धोरण जाहिर केले आहे. त्यांनी शनिवारपासून (१७ जानेवारी) आरटीओ कार्यालय दलालमुक्त करण्याचे आदेश दिले आहे. कार्यालयातील कामांमध्ये पारदर्शकता रहावी, यासाठी हा आदेश दिला आहे. आरटीओ कार्यालयात होणारी नागरिकांची लुट यामुळे थांबावी व त्यांना सरळसेवेचा लाभ मिळावा, हाच त्यांचा या मागील उद्देश आहे. शुक्रवारी लोकमत प्रतिनिधीने भंडारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा फेरफटका मारला असता, तिथे काही दलाल आढळून आले. शासनाने कितीही नियम बनविले तरी, ते पायदळी तुडवायचे हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे आयुक्तांच्या या आदेशाची अंमलबजावणी भंडारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात होणार याबाबत शासंकता वर्तविण्यात येत आहे. आयुक्तांच्या आदेशाचे पालन करण्यात येत आहे. अनधिकृत दलालांपासून कार्यालयाची मुक्तता झाली आहे. आरटीओचे काही अधिकृत दलाल असून त्यांच्या प्रतिनिधींची कामे करण्यात येत आहे. दलाल मुक्तीमुळे नागरिकांचे कमी वेळात, कामे होऊ लागली आहेत. आयुक्तांच्या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. त्यांच्या आदेशाने लक्षणीय सुधारणा झाली आहे. नागरिकांनीही स्वत:ची कामे स्वत:च करावी ज्यामुळे दलाल मुक्ती होईल.- अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, भंडारा.