शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारसाठी ४.९० कोटींचा खर्च

By admin | Updated: February 20, 2017 00:16 IST

पावसाचे पाणी गाव शिवारात अडवून भुगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे हा मुख्य उद्देश्य नजरेसमोर ठेवून सिंचन क्षमता वाढविण्यावर भर देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे.

इंद्रपाल कटकवार भंडारापावसाचे पाणी गाव शिवारात अडवून भुगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे हा मुख्य उद्देश्य नजरेसमोर ठेवून सिंचन क्षमता वाढविण्यावर भर देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे मागील ११ महिन्यात जिल्ह्यात ३४८ कामे पुर्ण झाली असून त्यावर ४ कोटी ८९ लक्ष ७५ हजार रूपये खर्च करण्यात आले आहे.२०१६-२०१७ या वित्तीय वर्षाच्या जानेवारी महिन्यापर्यंत भंडारा जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ५९ गावांची निवड करण्यात आली आहे. अभियानांतर्गत २३८९ कामे पूर्ण करायची असून यासाठी ६१ कोटी ३० लक्ष रूपये खर्च अपेक्षित आहे. ४१९ कामांपैकी ३४८ कामे पूर्ण झाली असून ७१ कामे प्रगती पथावर आहेत. उर्वरीत कामे ई निविदा प्रक्रियेत असल्याचे समजते. भंडारा जिल्ह्यात भातपिकाचे उत्पादन अधिक घेतले जात असल्याने हंगाम आटोपल्यावरच उपरोक्त अभियानाच्या कामांना गती मिळत असते.भंडारा तालुक्यातील चोवा, रावणवाडी, खुटसावरी, गुंथारा, सालेहेटी, टेकेपार, कोका, सर्पेवाडा, दुधाळा, राजेदहेगाव. मोहाडी तालुक्यातील महालगाव, डोंगरगाव, हिवरा, चिचोली, आंधळगाव, पालडोंगरी, नवेगाव, धोप, ताळगाव, जांब. तुमसर तालुक्यातील हिंगणा, मिटेवानी, झारली, येदरबुची, राजापूर, लोभी, सौदेपुर, सोनेगाव, देव्हाडी, सुकळी तर पवनी तालुक्यातील तांबेखानी, रेंगेपार, ब्रम्ही, निलज, भुयार, आमगाव, कातुर्ली, धानोरी, शेलारी या गावांचा समावेश आहे. याशिवाय लाखनी तालुक्यातील नऊ, साकोली तालुक्यातील सहा तर लाखांदूर तालुक्यातील झरी, पारडी, तिरखुरी, दिघोरी, पेंढरी (सोनेगाव) या गावांची निवड करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना या अभियानांतर्गत फायदा मिळवून देण्यासाठी त्या दिशेने जिल्हा कृषी कार्यालयाचे कामे सुरू आहे. सिंचन सुविधा विकसित करण्यावर भर दिला जात आहे. -डॉ. नलिनी भोयर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा