शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द पुनर्वसन, सुविधेसाठी २६० कोटी रूपयांचा निधी

By admin | Updated: February 21, 2017 00:20 IST

गोसेखुर्द धरणात जी गावे गेली त्या गावांचे पुनर्वसन करताना जनसुविधायुक्त पुनर्वसनासाठी केंद्र सरकारने २६० रूपयांचा निधी दिलेला असून...

नाना पटोले : वाढीव कुटुंबाचा सर्वांना मोबदला मिळणारभंडारा : गोसेखुर्द धरणात जी गावे गेली त्या गावांचे पुनर्वसन करताना जनसुविधायुक्त पुनर्वसनासाठी केंद्र सरकारने २६० रूपयांचा निधी दिलेला असून येत्या दोन वर्षांत पुनर्वसन गावात जनसुविधा निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या असून योग्य जनसुविधा निर्माण होतील, प्रकल्पग्रस्त कूटुंबाला वाढीव कुटूंबाचे पैसे मिळतील, प्रकल्पही पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही खासदार नाना पटोले यांनी दिली.जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय जनता दरबारात ते बोलत होते. यावेळी आमदार रामचंद्र अवसरे, नगराध्यक्ष सुनील मेंढे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते, तहसिलदार संजय पवार व विविध विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी खा.पटोले म्हणाले, प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गरजू व गरीब व्यक्तीला २०१९ पर्यंत घरकुल देण्याचा शासनाचा मानस आहे. यासाठी बीपीएल किंवा कुठलिही आर्थिक अट नसून प्रत्येक गरजू व गरीबाला घरकुल मिळेल. महसूल अभिलेख तसेच सातबारा अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी महसूल विभागाची असून वर्ग दोनची जमीन वर्ग एक करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार सर्व वर्ग दोनच्या जमिनी एका महिन्यात वर्ग एक करण्यासाठी तहसिलदारांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश दिले. विकासाचा केंद्रबिंदू ग्रामपंचायत मानून शासनाने ग्रामपंचायतीला मोठया प्रमाणात अधिकार दिले आहेत. विकास निधी थेट ग्रामपंचायतींना देण्यात येतो. त्यामुळे ग्रामपंचायतीनी आपल्या गावाच्या गरजेनुसार ग्रामपंचायतीचा विकास आराखडा तयार करावा व विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. झुडपी जंगल व सामूहिक वनहक्क दाव्यांचे सर्व प्रकरण निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रलंबित वीज जोडण्या ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. पुनर्वसन करताना स्मशानभूमी गावाच्या मध्यभागी ठेवण्यात आल्याच्या तक्रारी नागरिकांनी या जनता दरबारात केल्या. त्यावर नाना पटोले म्हणाले, स्मशानभूमी गावाच्या मध्यभागी असलेल्या सर्व गावांचे सर्वेक्षण करून पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच अभिलेख दुरूस्ती करावी. मुख्यमंत्री पांदण रस्ते योजनेत रस्त्यांची कामे करून घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. भंडारा शहरातील अतिक्रमणधारक व छोटे व्यावसायिक यांच्यासाठी शहर विकास निधी योजनेंतर्गत कायमस्वरूपी गाळे तयार करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनी अवैध दारूविक्रीसंबंधी तक्रारी मांडल्या असता अवैध दारूविक्री तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले. या जनता दरबारात घरकुल, पट्टेवाटप झुडपी जंगल, स्मशानभूमी, पुनर्वसन, निराधार योजनेचा लाभ, पिण्याचे पाणी, रस्ते, शौचालय, राष्ट्रीय कुटूंब योजना, वीज, बसस्थानक, शाळा, वनहक्क दावे यासह विविध प्रश्न व समस्या नागरिकांनी मांडल्या. या प्रश्नांची दखल घेऊन प्रशासनाने त्या विहीत मुदतीत सोडवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी संबंधित विभागाला केले. (जिल्हा प्रतिनिधी)