रिमझिम पाऊस तरीही शेतकरी संकटात, धानासाठी हवाय दमदार पाऊसदेवानंद नंदेश्वर भंडाराजिल्ह्यात दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत असला तरी शेतात पाणी साठवण झालेली नाही. त्यामुळे ७६ हजार ६३५ हेक्टर क्षेत्रातील रोवणी खोळंबली आहे. शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात आजपर्यत केवळ ५२.५९ टक्के रोवणी आटोपली आहे. जिल्ह्यात १ लाख ६१ हजार ४२३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ८४ हजार ७८८ हेक्टर क्षेत्रात रोवणी करण्यात आली. यामध्ये भंडारा तालुक्यात १५,०४५ हेक्टर, पवनी ९,६३७ हेक्टर, मोहाडी १४,७०७ हेक्टर, तुमसर ११,७०० साकोली १०,५००, लाखांदूर १२,५१० तर लाखनी तालुक्यात १०,६८८ हेक्टर क्षेत्रात रोवणीचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यातील ८३ हजार ०२० हेक्टर क्षेत्रातील खरीप पिक पेरणी खोळंबली आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे ही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्ह्यात एक लाख ९४ हजार ९८८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होत असून, आतापर्यंत केवळ ५७ टक्के हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात १७ हजार १०५ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी १७ हजार २४६ हेक्टर क्षेत्रात भात नर्सरीची लागवड करण्यात आली असून त्याची टक्केवारी १०० एवढी आहे. यामध्ये भंडारा तालुक्यात २,७२६ हेक्टर, पवनी २,३०० हेक्टर, मोहाडी ३,२५५ हेक्टर, तुमसर २,९१० साकोली १,६६२, लाखांदूर २,३६१ तर लाखनी तालुक्यात २,०३० हेक्टर क्षेत्रात भात नर्सरीची लागवड करण्यात आली. जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी १६ हजार ५१७ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ८ हजार ७८७ हेक्टर क्षेत्रात आवत्याची लागवड केलेली आहे. त्याची टक्केवारी ५३ एवढी आहे. भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक लागवड लाखनी तालुक्यात असून २,५८८ हेक्टर आहे. भंडारा ७६ हेक्टर, पवनी २,०७५, मोहाडी ९१, तुमसर ८३, साकोली १,३८५ तर लाखांदूर तालुक्यात २,४८९ हेक्टर क्षेत्रात आवत्याची लागवड करण्यात आली. भंडारा जिल्ह्यात तुर १०,१०७, मुंग १२, तीळ ७४, सोयाबिन २,३५६, ऊस ४,०४४, हळद ४३३, कापूस ५६१, तर भाजिपाल्याची ६१८ हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली़ रिमझिम पावसाने हजेरी लावली असली तरी पाऊस अनियमित बरसला. तो वेळेनुसार पडला असता तर ही वेळ आली नसती. आता रोवणीसाठी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.अनियमित पावसाने दिला दगाजिल्हयात आज ६ आॅगस्ट रोजी २३.९ मि.मी. पाऊस पडला असून त्याची ३.४ मि.मी. आहे. १ जून ते ६ आॅगस्ट पर्यंत ४११६.२ मि.मी. पाऊस पडला असून त्यांची सरासरी ५८८ मि.मी इतकी आहे. आज ६ आॅगस्ट रोजी पडलेला पाऊस तालुका निहाय भंडारा - १.५ मिमी., मोहाडी २.८, तुमसर ३.४, पवनी २.६, साकोली ७.२, लाखांदूर १, लाखनी ५.४ असा एकूण २३.९ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ३.४ मि.मी. आहे. १ जून ते ६ आॅगस्ट पर्यंत तालुका निहाय पडलेला पाऊस भंडारा ६३१.४ मि.मी., मोहाडी ६६४.९, तुमसर ५७८.२, पवनी ६०२.१, साकोली ५१४.३, लाखांदूर ५२०.८, लाखनी ६०४.५ असा एकूण ४११६.२ मि.मी. पाऊस झाला असून त्याची सरासरी ५८८ मि.मी. इतकी म्हणजे ८२ टक्के पाऊस बरसला आहे.हवामान खात्याचा अंदाज ठरला फोलशेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत असताना दोन दिवसांपुर्वी पावसाने हजेरी लावली. शेतकरी आनंदीत झाला. मात्र दमदार पावसाअभावी पावसाचे पाणी शेतामध्ये जमा झाले नाही. रोवणीसाठी चिखलणी करणे आवश्यक असते. मात्र चिखलणी करण्यासाठी शेतात पाणी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोवणीची कामे थांबविली आहे. हवामान खात्याने ५ आॅगस्ट रोजी अतिवृष्टीचा इशारा देऊन नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. मात्र उशिरापर्यत दमदार पाऊस कोसळला नाही. प्रत्येकवेळीप्रमाणे यावेळदेखील हवामान खात्याने शेतकऱ्यांचा हिरमोड केल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
रोवणी खोळंबली
By admin | Updated: August 7, 2015 00:41 IST