शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रोवणीला मजूर सापडेना

By admin | Updated: July 14, 2016 00:39 IST

पावसाच्या दमदार आगमनानंतर पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांनी रोवणी प्रारंभ केला आहे.

मजुरी वाढली : रोवणीच्या कामाला वेग, खतांच्या किंमती जुन्याच दराने मुखरू बागडे पालांदूर पावसाच्या दमदार आगमनानंतर पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांनी रोवणी प्रारंभ केला आहे. सध्या रोवणीचा हंगाम असल्याने मजुरी वाढली आहे. यामुळे पालांदूर परिसरात मजूर मिळत नसल्याने बाहेरगावावरून महिला व पुरूष मजुर आणून रोवणी आटोपली जात आहे. जून महिन्यात पावसाने दगा दिला. पेरणी प्रभावित झाली. जुलै लागताच मान्सून मेहरबान झाला. पहिल्या आठवड्यातच १५२ मि.मी. पावसाची हजेरी लावित शेतकऱ्यांना आनंद देत रोवणीला आरंभ झाला. पालांदूर मंडळात २५ टक्के तर मंडळ कृषी क्षेत्रात २० टक्के रोवणी आटोपली असून पाऊस मेहरबान राहिल्यास १५ दिवसात रोवणी पूर्ण होईल. पालांदूर व परिसरात स्वतंत्र सिंचन व्यवस्थेतून रोवणीला आरंभ झाला असून त्यांच्या मागोमाग कोरडवाहू शेतकरीही १२-१५ दिवसाचे पऱ्हे शेतीत रोवित असल्याने मागे पुढे रोवणी सुरू झाली आहे. यामुळे मजुरांची तीव्र टंचाई सुरू आहे. वाकल, तई, हरदोली, ढिवरखेडा, मऱ्हेगाव, किटाडी, पिलांद्री येथून मजुरांची आवक सुरू आहे. महिलांना दिवसाकाठी १०० तर पुरूषांना २०० रूपये मजुरी दिली जात आहे. हुंडा पद्धतीत २२००-२४०० रूपये प्रती एकर रोवणीचा दर सुरू आहे. जुन महिन्यात फक्त ९४.३ मि.मी. पावसाने हजेरी लावली होती. यंदाही दृष्काळ पडेल का, ही भिती शासन प्रशासनासह शेतकऱ्याला पडली होती. मात्र निसर्ग खरचं श्रेष्ठ असल्याचे ठासून सांगत धरतीमातेला तृप्त केले. जलसाठ्यात २० टक्के वाढ झाली असून नदी नाले प्रवाहित झाले आहेत. विहिरी, बोअरवेल्सच्या भुजलसाठ्यात सुधारणा झाली आहे. ट्रॅक्टरच्या मुबलकतेने शेती कसायला मोठी मदत झाली असून शारीरिक श्रमाची बचत झाली आहे. खतांच्या किंमती केंद्र शासनाने कमी केल्या खऱ्या पण कृषीकेंद्रात जुन्याच दराने विक्री सुरू आहे. शासन प्रशासन यांनी समन्वय साधन कृषी केंद्रधारकांना विश्वासात घेत त्यांच्या जुन्या खरेदीचा विचार करून मार्ग दिला तर खेतकऱ्यांना सुद्धा कमी दराचा फायदा मिळू शकतो. अन्यथा घाऊक व्यापाऱ्यांची चांदी होवून लहान व्यापारी पिसला जाऊ शकतो याचा थेट नुकसान शेतकऱ्यांना बसू शकतो.