शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
3
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
4
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
5
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
6
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
7
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
8
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
9
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
10
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
11
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
12
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
13
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
14
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
15
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
16
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
17
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
18
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
19
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
20
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...

रोहयो कामावर १२ हजार मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2017 00:48 IST

तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ९२ कामे सुरु आहेत. ११ हजार ८२२ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.

लाखनी तालुका : रोहयो कामांची मागणी, ७६ हजार मजुरांची नोंदणी, ९२ कामे सुरुचंदन मोटघरे लाखनीतालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ९२ कामे सुरु आहेत. ११ हजार ८२२ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती असताना रोहयो कामाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यात रोहयो कामांना गती मिळाली असली तरी पंचायत समिती व ग्रामपंचायत पुरेशा मजुरांना हाताला काम देण्यास अपुरे ठरत आहे.तालुक्यात मामा तलावाची १७ कामे, सेलोटी डोंगरगाव /न्या., देवरी, खराशी, मोरगाव, बोरगाव, किन्ही, निलागोंदी, घोडेझरी, डोंगरगाव/साक्षर, सोनगाव, खुनारी, निमगाव, कन्हाळगाव, शिवनी येथे सुरु आहेत. या कामांवर ४९६२ मजूर काम करीत आहे. नाला सरळीकरणाची ७ कामे सुरु. कोलारी, लाखोरी, पालांदूर, सावरी, गोंडेगाव, झरप येथे सुरु आहेत. या कामावर २९४५ मजूर कामावर आहेत. पांदन रस्त्याची ११ कामे गोंडसावरी, मोगरा, कनेरी, दिघोरी, खेडेपार, गुरढा, जेवनाळा, राजेगाव, केसलवाडा / पवार, खुर्शीपार येथे सुरु आहे. पांदण रस्त्याच्या कामावर ३५४१ मजूर कामावर आहेत. सिंचन विहिरीची १२ भातखाचऱ्यांचे ३ कामे, मुरमाडी / तुपकर येथे सुरु आहेत. तेथे ३३ मजूर कामावर आहेत. तालुक्यात ७१ ग्रामपंचायत व १०४ गाव आहेत. २६ हजार ८९८ कुटुंबांचे जॉब कार्ड तयार करण्यात आले आहेत. तालुक्यात ७६ हजार ४८८ मजुरांची नोंदणी आहे. त्यापैकी १२ हजार मजुरांना काम मिळाले आहे. तालुक्यात रोजगार हमी कामाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. अनेक मजूर कामांच्या प्रतिक्षेत आहेत. पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरून कामाचे नियोजन होवून प्रशासकीय मंजूरी मिळण्यास विलंब होत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे उदासीन धोरणामुळे तालुक्यात रोहयो कामांना गती मिळालेली नाही. तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. मजुरांना काम मिळत नाही. यामुळे मग्रारोहयो कामाकडे जनतेचे लक्ष लागले आहे.