शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे बंद

By admin | Updated: June 18, 2015 00:36 IST

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाचे बांधकाम केले. रस्ते बांधकाम, दुरुस्ती व देखभालची जबाबदारी खासगी..

नाल्यात घनकचरा : रात्री होतो त्रास, खोलगट जागेमुळे पाणी साचते, उड्डाण पुलाखाली अंधाराचे साम्राज्यजवाहरनगर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाचे बांधकाम केले. रस्ते बांधकाम, दुरुस्ती व देखभालची जबाबदारी खासगी कंत्राटदाराला दिली असून तसा करारनामा करण्यात आला आहे. मात्र, दोन महिन्यापासून पथदिवे व उड्डाण पूलाखालील दिवे बंद अवस्थेत आहे. परिणामी रस्त्यावरील वाहनधारक व पादचारी यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मुजबी येथील ४८५ मैल दगडापासून ते नागपूर येथील ५४३.६३० मैल पारडी नाका पर्यंत दगड रस्त्यावर उड्डाण पुलाखाली व बायपास रस्त्यावरील बोगद्यामध्ये विद्युत व्यवस्था खासगी कंत्राटदारातर्फे करारनाम्यानुसार करण्यात यायला पाहिले. मात्र, ठाणा पेट्रोलपंप, खरबी (नाका), शहापूर, फुलमोगरा येथील पथदिवे मागील महिन्यापासून बंद अवस्थेत आहे. ठाणा पेट्रोलपंप येथील उड्डाण पुलाखालील एका बाजूचे पथदिवे दोन महिन्यांपासून बंद आहेत. परिणामी अपरात्री येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना तथा वाहनधारकांना गाव व गावचे नामफलक वाचण्यास कमालीचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अस्तित्वात असलेले पथदिवे रात्री अपरात्री बंद केले जाते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील चोरटी आयात निर्यातीला व गाव खेड्यातील चोरट्या भामट्यांना रान मोकळे झाले आहे. माथनी येथील टोलनाका सुरु झाला आहे. संक्षिप्त टिप्पण क्रमांक २.०१ मध्ये उल्लेखीत करारानुसार वैद्यकीय सोयीसुविधा, रस्ता बांधकाम, रस्त्यावरील पथदिवे, नाल्याचा रखरखाव, रस्त्यावरील अडथळे दूर करण्याकरिता मोबाईल पथक चालविणे याकरिता हलके व जड चारचाकी व वरील वाहन धारकाकडून करारस्वरुपात पथकर घेतला जातो. मात्र सद्य:स्थितीत महामार्गावरील नवीन नाल्यामध्ये घनकचरा साचलेला आहे. काही ठिकाणी अपुरे व योग्य दिशा नसलेल्या नाल्या भूईसपाट झालेल्या आहेत. पावसाचे आगमन झालेले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पाणी हे रहदारी किंवा रस्त्यावरच साचत आहे. बायपास रस्त्यावरील बोगदा व खोलगड असल्यामुळे पाणी साचून राहत आहे. परिणामी पादचारी, दुचाकी वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील पावसाचे पाणी एकाच ठिकाणी संग्रहित करून परिसरातील पाण्याची पातळी वाढीसाठीची रस्त्याच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी ५०० मिटर मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची तरतूद आहे. मात्र असे कुठेच बांधकाम करण्यात आलेले नाही. रस्त्यावरील पाणी मोकाट सोडण्यात आलेले आहे. बंद अवस्थेत पडलेले पथदिवे, असुविधाजनक असलेले ठिकाणाकडे जिल्ह्यातील वरिष्ठ व संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)