शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

आमगावातील रस्ते चिखलात

By admin | Updated: July 18, 2016 01:30 IST

आमगाव शहरातील व ग्रामीण भागातील रस्त्यांची दरवर्षी दुरूस्ती व अपूर्ण बांधकामावर शासनाकडून

नागरिकांना प्रचंड त्रास : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह आमगाव : आमगाव शहरातील व ग्रामीण भागातील रस्त्यांची दरवर्षी दुरूस्ती व अपूर्ण बांधकामावर शासनाकडून निधी खर्च करण्यात येतो;परंतु नियोजनबध्द व कामावरील अनियमिततेमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मागील वर्षी बांधकाम झालेले डांबरीकरण रस्ते खड्यात व चिखलमय झाले आहे. या रस्त्यावरील मार्गक्रम करतांना नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. आमगाव ग्रामीण भागातील आमगाव पाऊलदौना, तिगाव, मुंडीपार, सुपलीपार, कातुर्ली, शिवनी, जवरी, सावंगी या मार्गावरील डांबरीकरण रस्ते दुरूस्ती व बांधकाम करण्यात आले. परंतु योग्य नियोजनाअभावी या रस्त्यांची वाताहात झाली आहे. रस्त्यावरील खड्डे पडले. त्याते पाणी साचल्याने मार्गक्रम करणाऱ्यांसाठी हे खड्डे धोक्याची घंटा वाजवित आहेत. आमगाव, मुंडीपार, कट्टीपार व कालीमाटी या मार्गावरील रस्त्यांची वाताहात आहे. कालीमाटील घाटटेमनी, भोसा, कातुर्ली मार्ग डांबरीकरण रस्त्याअभावी खड्यात रुपांतर झाले आहे. जामखारी, तिगाव, पाऊलदौना, कुंभारटोली या गावातील मुख्य मार्ग डांबरीकरण रस्त्यांच्या दैनावस्थेमुळे चिखलमय झाले. एक ते दीड फुटापर्यंतचे खड्डे पडले आहेत. तीच अवस्था किंडगीपार, जवरी व शिवनी मार्गावर दिसत आहे. परंतु संबंधीत विभागाने दखल घेतली नाही. या मार्गावरील नियोजनबध्द बांधकामाला लोकप्रतिनिधींनीच पाठ फिरविल्याने यापूर्वी झालेल्या बांधकामावरील निधी पाण्यात गेला. जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत तालुक्यात मोठ्या प्रमाणात २०१४-१५ व २०१५-१६ या आर्थिक वर्षात डांबरीकरण रस्ते बांधकाम व दुरूस्ती करण्यात आली. या बांधकामावर निधीचा खर्च करण्यात आला. परंतु बांधकाम नियोजनबध्द व योग्य बांधकामाअभावी सदर रस्ते पुन्हा पावसाळ्यात वर्ष लोटण्याआधी खड्यात रुपांतरीत झाले. आमगाव शहरातील मुख्य रस्ते दरवर्षी बांधकाम व दुरुस्ती करूनही खड्यात का रुपांतरीत होतात हा संशोधनाचा विषय नागरिकांसाठी आहे. नगरातील गांधी मार्ग ते नटराज मार्ग, बाजार समिती मार्ग, कामठा चौक मार्ग, लांजी मार्ग, पंचायत समिती मार्ग, किडंगीपार बायपास मार्ग, आंबेडकर मार्ग ते कुंभारटोली मार्गावरील दरवर्षी दुरूस्ती व बांधकाम झाल्यावरही या रस्त्यांची दैनावस्था कायम आहे. संबंधित विभागातील अधिकारी व कंत्राटदार यांच्या अनियमिततेमुळे बांधकाम निकृष्टपणे करण्यात येत आहेत. त्यामुळे या रस्त्यांची वाताहत झाली आहे. रस्त्यांवर मार्गक्रमन करण्यासाठी नागरिकांना पायी चालणे कठीण झाले आहे. या निकृष्ट रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनामुळे नागरिकांना अपघातांना समोर व्हावे लागत आहे. (शहर प्रतिनिधी)